हिस्सारचे भाजपा खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व सोडून काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आहे. भाजपापासून फारकत घेतल्यानंतर ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपापासून वेगळे होण्याची कारणदेखील सांगितली आहेत. मी भाजपाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहे. काही राजकीय कारणांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. भाजपा सोडण्यामागे अनेक कारणे होती. यापैकी शेतकरी, अग्निवीर आणि महिला कुस्तीपटूंच्या प्रश्नांवर माझे भाजपाशी वैचारिक मतभेद असून, मी अस्वस्थ होतो. त्यामुळेच मला असा निर्णय घ्यावा लागल्याचंही त्यांनी सांगितलं.

ब्रिजेंद्र हे भाजपाचे दिग्गज नेते चौधरी बिरेंद्र सिंग यांचे पुत्र आहेत. रविवारी दुपारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांच्या उपस्थितीत ब्रिजेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हिसार लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांचे ५१ वर्षीय पुत्र ब्रिजेंद्र सिंह हे हरियाणा कॅडरचे IAS अधिकारी आहेत. सुमारे दोन दशके त्यांनी अधिकारी म्हणून काम केले. ब्रिजेंद्र सिंह यांचे वडील चौधरी बिरेंद्र सिंह हे जाट समाजाचे महत्त्वाचे नेते मानले जातात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. भाजपा-जेजेपी युतीमुळे ते अस्वस्थ असल्याचे मानले जात आहे. हरियाणात भाजपा आणि जेजेपी यांच्यात युती झाली तर त्यात ब्रिजेंद्र सिंह नसतील, असेही त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.

What Abu Azmi Said?
अबू आझमींचं पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उत्तर, म्हणाले; “होय मी नाराज आहे”
nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
MIM, Kolhapur, Hindu organizations,
कोल्हापुरात ‘एमआयएम’चा पाठिंबा घेण्यामागे कोणते षडयंत्र दडले आहे; हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सवाल
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’

खरं तर पिता-पुत्रांनी अनेकदा जनतेच्या प्रश्नांवर भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. २०२० मध्येही त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांची बाजू घेतली होती आणि शेती कायदे मागे घेण्याचे आवाहन केले होते. तसेच भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चे माजी प्रमुख आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांवरून निषेध करणाऱ्या कुस्तीपटूंच्या आंदोलनातही ते सामील झाले होते.

हेही वाचाः ‘हिंदूंवर अन्याय करणारी घटना बदलण्याची गरज’; आमदाराच्या वक्तव्यावर भाजपानं झटकले हात, मागितलं स्पष्टीकरण!

दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पार्टी (जेजेपी)बरोबर युती करण्याचा भाजपाचा निर्णय हेदेखील त्यांच्या पक्षातून बाहेर पडण्याचे एक महत्त्वाचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही जिंदमधील एका सभेत ब्रिजेंद्र यांनी भाजपाला इशारा दिला होता. लोकसभा निवडणुकीसाठी जेजेपीशी युती केल्यास आपण पक्ष सोडणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ब्रिजेंद्र यांनी चौटाला यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. तेव्हा भाजपाने राज्यात १० जागा जिंकल्या होत्या. परंतु काही महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेजेपीच्या प्रमुखांनी ब्रिजेंद्र यांची आई प्रेम लता यांचा उचाना कलान मतदारसंघातून ४० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

हेही वाचाः Loksabha Election 2024: गांधी कुटुंबीयांनी कुठून निवडणूक लढवावी? उत्तर प्रदेश काँग्रेसला काय वाटतं?

जेजेपी नेत्याने सांगितले की, ब्रिजेंद्रचे कुटुंब पहिल्यासारखाच आणखी एक इशारा देत आहेत. चौटाला यांनी भाजपाशी युती तोडण्याची त्यांनी धमकी दिली होती, त्या धमकीची आठवण करून दिल्यानंतर त्यांचा राजीनामा आला. त्यांनी राजकारणावर आधारित निर्णय घ्यावेत आणि जेजेपीची चिंता करू नये,” असेही ते नेते म्हणाले. दुसरीकडे ब्रिजेंद्र यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाला हिस्सारमध्ये प्रबळ दावेदार उपलब्ध करून दिल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकरी नेते सर छोटू राम यांचे नातू आणि चौधरी नेकी राम यांचा पुत्रसुद्धा सिंह कुटुंब पुन्हा पक्षात आल्यामुळे खूश आहेत.

ब्रिजेंद्र केवळ हरियाणामध्येच नव्हे तर शेजारच्या उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही पक्षाला फायदा मिळवून देतील. जिथे जाटांची मोठी लोकसंख्या आहे. हरियाणा काँग्रेसचे संपर्क प्रमुख चंदवीर सिंग हुडा म्हणाले की, “जेव्हा भाजपाचा एक विद्यमान खासदार निघून जातो, तेव्हा काँग्रेस पुन्हा सत्तेत येत असल्याचे स्पष्ट लक्षण आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कुमारी सेलजा यांनी ब्रिजेंद्र यांचे पक्षात स्वागत केले. “आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आहे. मला आशा आहे की, चौधरी बिरेंद्र सिंह लवकरच आमच्या न्यायाच्या लढाईत सामील होतील,” असेही त्या म्हणाल्या

सिंह यांनी काँग्रेस का सोडली होती?

२०१४ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी चौधरी बिरेंद्र सिंह काँग्रेसमधून भाजपामध्ये आले. ते तीन वेळा राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिले आहेत. १९९८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी ब्रिजेंद्र यांनी राजकारणात प्रवेश करण्यासाठी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतल्यावर २०२० मध्ये बिरेंद्र यांनी वरिष्ठ सभागृहाचा राजीनामा दिला होता, हिसारचे खासदार म्हणून निवडून आले होते. डुमरखा कलानचे रहिवासी असलेले बिरेंद्र यांनी दोनदा हरियाणा काँग्रेसचे प्रमुख म्हणून काम केले आहे आणि उचाना कलान येथून ते पाच वेळा आमदार राहिले आहेत. हरियाणा सरकारमध्ये ते तीन वेळा मंत्री राहिले आहेत. १९८४ मध्ये त्यांनी ओम प्रकाश चौटाला, जे नंतर हरियाणाचे मुख्यमंत्री बनले, त्यांना हिसार लोकसभा मतदारसंघातून मोठ्या फरकाने पराभूत केले. १९९१ मध्ये पक्षाचे अध्यक्ष राजीव गांधी यांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला, तेव्हा बिरेंद्र मुख्यमंत्री होण्याच्या सर्वात जवळ होते, असे मानले जाते. २०११ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC)चे प्रमुख म्हणून बिरेंद्र यांना उत्तराखंड आणि हिमाचलचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी प्रदेश आणि दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून दिला. २०१४ मध्ये काँग्रेस सोडण्याचा बिरेंद्र यांचा निर्णय ही राजकीय चूक होती, कारण ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते, असे निरीक्षकांचे मत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांचा प्रवेश रोखल्याने तेव्हा त्यांच्यासाठी पक्षात राहणे अशक्य असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. बिरेंद्र यांच्या संभाव्य पुनरागमनाकडे सकारात्मकतेने पाहिले जात असताना काँग्रेस नेत्यांचा एक गट त्यांच्यापासून सावध आहे, कारण त्यांना गटबाजी तीव्र होण्याची भीती आहे. सेलजा, रणदीप सिंग सुरजेवाला आणि किरण चौधरी या तीन ज्येष्ठ नेत्यांनी हुड्डांच्या राज्यभरातील कार्यक्रमांच्या समांतर बैठका यापूर्वीच घेतल्या आहेत. हुडांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, “गेल्या १० वर्षांत हरियाणाच्या राजकीय परिस्थितीत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. या क्षणी बिरेंद्र आणि हुड्डा दोघांनाही एकमेकांच्या महत्त्वाची जाणीव आहे. राज्य भाजपाचे मुख्य प्रवक्ते संजय शर्मा म्हणाले, “काँग्रेस त्यांना भाजपाइतके देऊ शकले नाही, परंतु महत्त्वाकांक्षेला अंत नसतो. काँग्रेसने त्यांना (चौधरी बिरेंद्र) साधे केंद्रीय मंत्रीही केले नाही, तर भाजपाने त्यांच्या मुलाला खासदारही केले. ते एका बुडत्या जहाजात सामील होत आहेत, असाही टोला शर्मा यांनी लगावला.