हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशात ६८ जागांसाठी मतदान घेतलं जाणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. पण बिलासपूर जिल्ह्यातील श्री नैना दैवीजी मतदारसंघात वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. येथील भाजपा आणि काँग्रेसचे उमेदवार आपल्या पक्षाच्या जुन्या पंतप्रधानांच्या कामांचा उल्लेख करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील राजकारण दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्याभोवती फिरत आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्यामुळे हिमाचल प्रदेशात विकासाला चालना मिळाली, असं विधान काँग्रेसचे उमेदवार राम लाल ठाकूर यांनी केलं आहे. “आजच्या घडीला हिमाचल प्रदेश ज्या ठिकाणी पोहोचलं आहे, त्याचं सर्व श्रेय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचं आहे. त्यांच्याशिवाय हिमाचल प्रदेशाची प्रगती शक्य नव्हती” असं ठाकूर म्हणाले. राम लाल ठाकूर हे श्री नैना देवीजी मतदारसंघातून तीन वेळा मंत्री आणि पाच वेळा आमदार राहिले आहेत.

ही वाचा-

इंदिरा गांधी यांनी २५ जानेवारी १९७१ रोजी हिमाचल प्रदेशला देशाचे १८ वे राज्य म्हणून घोषित केलं. त्यानंतर या राज्याची प्रगती झाली. तसेच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनीही विकासाला चालना दिली, त्याबद्दल त्यांचही कौतुक केलं जात आहे, असं विधान ठाकूर यांनी केलं आहे.

हेही वाचा- काँग्रेस पक्ष आणि ‘भारत जोडो’ यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करा, कोर्टाचा आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, श्री नैना देवीजी मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार रणधीर शर्मा म्हणतात की, भाजपाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या काळात सुरू केलेले प्रकल्प आणि योजना हिमाचल प्रदेशसाठी ‘गेम चेंजर’ ठरल्या. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी खेड्यांमध्ये रस्ते जोडणी करण्यासाठी ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’ (PGMSY) सुरू केली, त्याबद्दल वाजपेयींचं सर्वत्र कौतुक होत आहे. राज्यात काँग्रेसनं काही कल्याणकारी योजना आणली का? असा सवालही शर्मा यांनी विचारला.