संतोष प्रधान

राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एक समान धागा आहे व तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपलाही बाळासाहेबांच्या नावाचा सातत्याने आधार घ्यावा लागत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण समारंभात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे आदी साऱ्याच शिवसेना विरोधकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा गौरव केला. यामुळेच बाळासाहेबांचे नाव वापरल्याशिवाय भाजपला राज्यात मते मिळत नाहीत, असा खोचक चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढला.

हेही वाचा… खासदार-आमदार पुत्राची आमदारकीसाठी लगीन घाई

हेही वाचा… शिक्षक मतदारसंघाच्या निमित्ताने भाजपची लोकसभा-विधानसभेची पेरणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपलीच शिवसेना खरी हे अधोरेखित करण्याकरिता एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने बाळासाहेबांच्या नावाचा जयघोष केला जातो. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता ही जोड दिली जाते. बाळासाहेबांच्या उल्लेखाशिवाय शिंदे गटाच्या कोणाही नेत्याचे भाषण पूर्ण होत नाही. राज्यात सत्ताबदल झाल्यावर भाजप नेत्यांच्या तोंडीही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव येऊ लागले आहे. वास्तविक शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्याएवढा भाजप आणि रा. स्व. संघाचा उपमर्द कोणीही केला नसेल. पण बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपलाही बाळासाहेबांचे नाव घ्यावे लागते.