गणेश यादव, लोकसत्ता

पिंपरी : पुणे ग्रामीण, शहर आणि पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित असून त्यांनी प्रचाराचा प्रारंभ केला आहे. तर, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंगळवारी प्रवेश करणार असून महायुतीत राष्ट्रवादीकडून ते लढणार आहेत.

Akola Lok Sabha constituency, MLA s Reputations at Stake , vidhan saba constituency, votes will Decisive, mp s Election, bjp, vanchit bahujan aghadi, congress, lok sabha 2024, election 2024,
अकोला : लोकसभा निवडणुकीत आमदारांची कसोटी, विधानसभा मतदारसंघनिहाय मतांचे गणित निर्णायक
sunetra pawar marathi news, sharad pawar marathi news
…अन् शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर सुनेत्रा पवारांनी हातच जोडले !
Chandrapur, new voters,
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत नवमतदार, महिला मतदारांची भूमिका निर्णायक
akola bjp senior leader narayanrao gavhankar
अकोल्यात भाजपमध्ये बंडखोरी, माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांचा अर्ज दाखल

शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव, जुन्नर, खेळ-आळंदी, हडपसर, शिरूर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश येतो. या मतदारसंघात मागीलवेळीही डॉ.कोल्हे आणि आढळराव-पाटील यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या कोल्हे यांनी सलग तीन वेळा खासदारकी भूषविलेल्या आढळराव-पाटील यांचा पराभव केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली आहे. डॉ.कोल्हे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असून महाविकास आघाडीत शिरुर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार आहे. डॉ.कोल्हे तुतारी घेऊन पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांना ठाकरे गट आणि काँग्रेसची साथ मिळणार आहे.

आणखी वाचा-‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत डाव्यांचा दबदबा कायम

काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्यावर टीका करणारे माजी खासदार आढळराव-पाटील शिवसेना सोडून खासदारकीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मंगळवारी त्यांचा प्रवेश होणार असून त्याचदिवशी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. आढळराव-पाटील यांना उमेदवारी देण्यास खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा तीव्र विरोध होता. त्यांची नाराजी दूर करण्यात सध्यातरी अजित पवार यांना यश आले आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीही आयात उमेदवार नको म्हणत विरोध केला होता. पण, त्यांचा विरोध डावलण्यात आला. त्यामुळे आमदार मोहिते, लांडे हे आढळराव यांचे मनापासून काम करतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आढळराव यांना शिवसेना, भाजपची साथ राहणार आहे.

उमेदवारी निश्चित होताच खासदार डॉ. कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. गेल्या वेळचा बदला घेण्यासाठीच आपण निवडणुकीला उभे राहणार असून यावेळी निवडून येणार याची शंभर टक्के खात्री आहे. ही निवडणूक हे सर्व ‘रेकॉर्ड’ तोडणारी असेल, असे आढळराव-पाटलांनी म्हटले. तर, त्याला प्रत्युत्तर देताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, की बदला घेण्यासाठी आढळराव-पाटील हे निवडणूक लढणार असतील तर एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? का फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्यांच्याच माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे? निवडणुकीला सामोरे जाण्याचा कोणाचा काय हेतू आहे, हे स्पष्ट होत आहे. मायबाप जनतेकडे मी आशिर्वाद मागतोय. त्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. त्यांना जर बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुज्ञ आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात दोघांमध्ये आणखी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-मोहिते-पाटलांचे संभाव्य बंड फसले?

शिरुरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद!

शिरुर लोकसभा मतदारसंघातील आंबेगावचे आमदार दिलीप वळसे-पाटील,जुन्नरचे अतुल बेनके, खेळ-आळंदीचे दिलीप मोहिते, हडपसरचे चेतन तुपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे हे मित्र पक्ष भाजपचे आहेत. तर, शिरुरचे अशोक पवार हे एकमेव आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिरूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद दिसून येत आहे.