मोहम्मद जावेद आणि त्यांची मुलगी आफरीन फातिमा, यांचे घर उत्तर प्रदेश प्रशासनाने तोडले. प्रयागराजमध्ये नुपूर शर्मा यांच्या विधानावर झालेल्या आंदोलनानंतर ही कारवाई करण्यात आली. मोहम्मद जावेत आणि आफरीन फातिमा शहरातील सिव्हिल सोसायटीचे आणि वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. जावेद हे पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य आहेत तर आफरीन ही विद्यार्थी शाकह असलेल्या बंधूत्व चळवळीची राष्ट्रीय सचिव आहे. 

५४ वर्षीय मोहम्मद यांना शनिवारीजिल्हा पोलिसांनी अटक केली. पोलीसांनी दावा केला आहे की मोहम्मद  प्रयागराज येथे झालेल्या आंदोलनाचा प्रमुख सूत्रधार आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की चौकशीदरम्यान जावेदने सांगितले आहे की याबाबत आफरीनसुद्धा त्याला सूचना द्यायची. मात्र प्राथमिक तपासात तिच्या विरुद्ध कुठलेही पुरावे आढळून आले नाहीत. वेल्फेअर पार्टीचे अध्यक्ष इलियास एसक्यूआर म्हणाले “जावेद २०११ पासून आमच्या पक्षाचे एकनिष्ठ सदस्य आहेत. त्यांनी पक्षात अनेक पदे भूषवली आहेत. या प्रकरणात त्यांना कायदेशीर मदत करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू.मोहम्मद यांना हा प्रकरणात विनाकारण फसवले जात आहे. ते प्रयागराज येथे झालेल्या निषेधाचा भाग नव्हते आणि त्यांनी या आंदोलनाची घोषणादेखील केली नव्हती. 

प्रयगराज येथील एका कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार गेल्या ३० वर्षात प्रयगराज येथे झालेल्या अनेक आंदोलनात मोहमद सहभागी झाले होते. २०२० मध्ये झालेल्या एनआरसी-सीएए आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. या आंदोलनात सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता आणि त्यांच्यापैकी एक मोहम्मद जावेद होता. आपली ओळख न सांगण्याच्या अटीवर जावेदच्या एका मित्राने सांगितले की ” १९८० च्या दशकात कॉलेजमध्ये असतानाच जावेदच्या राजकीय जीवनाला सुरवात झाली. प्रयगराजच्या इविंग ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी बीएचे शिक्षण पूर्ण केले.जावेद पाईप आणि वॉटर फिटिंगचा व्यवसाय करतात. परवीन फातिमा यांच्याशी त्यांचा विवाह झाला असून त्यांना तीन मुली आणि २ मुले अशी एकूण ५ अपत्ये आहेत

मुस्लिम महिला आणि विध्यार्थ्यांच्या समस्यांवर आफरीन विद्यार्थी दशेपासूनच काम करत आहे. तिने अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून भाषा शास्त्रात बीए ऑनर केले आहे. २०१८-१९ मध्ये ती विद्यापिठाच्या महिला महाविद्यालयीन संघाची अध्यक्ष होती. २०१९ मध्ये2 तिने जेएनयूमध्ये प्रवेश घेतला आणि तिथल्या विद्यार्थी चवळवळीत सहभागी झाली. २०२१ मध्ये तिने जेएनयूमधून पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आफरीन वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी झाली होती.  हा वर्षी जेव्हा कर्नाटकात हिजाबचा निषेध झाला होता तेव्हा ती बंधुत्व चळवळीच्या शिष्टमंडळासह उडपी आणि मंगळूर येथे आंदोकांशी संवाद साधण्यासाठी गेली होती.