काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा राजस्थानमध्ये येण्याआधीच मुख्यमंत्री अशोक गेहलोत व मुख्यमंत्रीपदाचे स्पर्धक सचिन पायलट यांच्यामधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. काही दिवसांपूर्वी अशोक गेहलोत यांनी पायलट यांना ‘गद्दार’ म्हणत अपमानित केलं होतं. त्यामुळे राजस्थानमधील दोन्ही नेत्यांच्या गटांत तणाव वाढला आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला बोलताना गेहलोत यांनी पायलट यांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला होता. पायलट यांनी २०२० मध्ये काँग्रेसविरुद्ध बंड पुकारून आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करता येणार नाही, असेही गेहलोत म्हणाले होते. या सत्तासंघर्षावर पक्षाध्यक्ष खरगे वा अन्य नेत्यांकडून भाष्य करण्यात आले नव्हते. मात्र, आता काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : गुजरात जिंकण्यासाठी ‘आप’चा मास्टरप्लॅन! मोठे प्रोजेक्टर्स आणि नुक्कड सभांच्या माध्यमातून जोमात प्रचार

“आमच्यासाठी काँग्रेसच्या पक्षसंघटनेस सर्वोच्च महत्त्व आहे. राजस्थानमधील समस्येवर पक्ष संघटना मजबूत होईल, असाच तोडगा आम्ही काढू. त्यासाठी आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागला तर आम्ही प्रसंगी तो घेऊ. या प्रकरणी जर (गेहलोत-पायलट गटांदरम्यान) सर्वसंमतीने तडजोड करता आली तर ती केली जाईल. या वादावर काँग्रेस नेतृत्व योग्य तोडगा काढण्यासंदर्भात विचार करत आहे. पण, हे कधी होणार, याबाबत कोणतीही कालमर्यादेची मुदत नाही. ही मुदतही काँग्रेसचे नेतृत्वच ठरवेल,” असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : ‘भारत जोडो यात्रे’त झळकला राहुल गांधींचा ‘जबरा फॅन’, ११ वर्षांपासून चालतोय अनवाणी पायांनी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गेहलोत यांनी काही शब्दप्रयोग टाळायला हवे होते’

“राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी या काही शब्दप्रयोग करणे टाळायला हवे होते. मात्र, अन्य राज्यांप्रमाणेच राजस्थानमध्येही ‘भारत जोडो’ यात्रेची यशस्वी वाटचाल होईल. गेहलोत हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. सचिन पायलट हे तरुण, लोकप्रिय नेते आहे. काही मतभेद आहेत, पण पक्षाला दोघांची गरज आहे. पक्षाचे हित लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल,” असे जयराम रमेश यांनी म्हटलं.