Kamalnath Political Journey: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपामध्ये जाण्याबाबत ते द्विधा मनस्थितीत असल्याचे, पक्षांतर्गत सूत्रांनी संगितले आहे. कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेसचा डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. या निवडणुकीत १६३ जागांमध्ये काँग्रेसने केवळ ६६ जागा जिंकल्या. कमलनाथ यांच्यासह त्यांचा मुलगा खासदार नकुलनाथदेखील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कमलनाथ छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून नऊ वेळा खासदार राहिले आहेत. पी. व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते. २०१९ मध्ये मुलगा नकुलनाथ या जागेवरून निवडून आल्यानंतर त्यांनी ही जागा सोडली. आता कमलनाथ हे आमदार आहेत; तर त्यांचा मुलगा नकुलनाथ खासदार आहे.

कमलनाथ यांच्यासह मुलगा नकुलनाथही भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांना मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेतृत्व सोपवले. कमलनाथ यांना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. कमलनाथ यांच्या राजकीय कार्यकाळात अनेक चढ-उतार आलेत. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील मैलाचा दगड मानला जातो. एकूण २३० जागांपैकी ११४ काँग्रेसला; तर १०९ जागा भाजपाला मिळाल्या होत्या. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाने त्यांचा कार्यकाळ संपला आणि मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेतृत्व जितू पटवारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर
State president of NCP Sharad Pawar faction Jayant Patil criticizes BJP
जयंत पाटील म्हणतात, ‘संविधान बदलण्याचा कट हा ‘त्यांच्या’ ४०० पारच्या घोषणेतून…”
Sharad Pawar on PM Narendra Modi
“सत्ता राखण्यात मोदीजी इतके तल्लीन झाले की, त्यांना…”; चीनच्या कुरापतीवरून शरद पवार गटाची पंतप्रधानांवर टीका
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप

२०१८ च्या निवडणुकांमध्ये ठरले राजकारणातील धुरंधर

विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी कमलनाथ यांनी मे २०१८ मध्ये एमपीसीसी प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी काँग्रेसच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पक्षाची नव्हतीआणि गटबाजीही होती. इतकच काय तर पक्षाच्या अनेक कार्यालयांमध्ये शौचालयासारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव होता. कमलनाथ यांनी स्वतः रणनीती आखून बूथ-स्तरीय व्यवस्थापनावर भर दिला आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे चित्रच पालटलं. कमलनाथ यांच्यातील कौशल्य आणि चतुराईमुळे त्यांना गटबाजीवर मात करण्यात आणि राज्य काँग्रेसला संघटित करण्यात यश आले. निवडणुकीत विशिष्ट लोकसंख्येला लक्ष्य करण्यासाठी त्यांनी सर्वेक्षणांचा आधार घेतला. त्यांच्या निवडणूक रणनीतितील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे त्यांनी स्वतःला हनुमान भक्त म्हणून जनतेसमोर सादर केले. हिंदुत्ववादी भूमिका दाखवणे हे त्यावेळी त्यांच्या रणनीतीचाच भाग होते. कमलनाथांच्या या रणनीतीने भाजपाच्या हिंदुत्वाच्या रणनीतीला जोरदार टक्कर दिली. ज्यामुळे काँग्रेसला भाजपाचा पराभव करण्यास मदत झाली.

कमलनाथ यांच्यावर पक्षांतर्गत आरोप

२०१८ च्या निवडणुकीतील विजयाचा आनंद फार काळ टिकला नाही. १५ महिन्यांच्या कार्यकाळात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वाखालील बंडाचा सामना करावा लागला. ज्योतिरादित्य सिंधिया, आरपीएन सिंह, हार्दिक पटेल यांच्यासह काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. मध्य प्रदेश काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. काँग्रेसमधील अस्थिरतेमुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्षात आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आणि कमलनाथ यांच्या पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने मध्य प्रदेशात २९ लोकसभा जागांपैकी २८ जागा जिंकल्या. काँग्रेसला फक्त छिंदवाडा लोकसभा मतदारसंघ राखण्यात यश आले. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, एमपीसीसीतील काही सदस्यदेखील कमलनाथ यांच्या नेतृत्व शैलीवर टीका करत होते. याकाळात पक्षांतर्गतच नाथ यांच्यावर अनेक आरोप झाले.

हेही वाचा : शेतकर्‍यांबरोबर चर्चेच्या चौथ्या फेरीत काय ठरले? शेतकऱ्यांसाठी केंद्राची पंचवार्षिक योजना काय आहे?

पक्ष फुटण्याची चिंता असलेल्या कमलनाथ यांनी तिकीट वाटप प्रक्रियेत पुढाकार घेतला परंतु यामुळे अनेक काँग्रेस नेत्यांनी मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली. बंडखोरी करणार्‍या आमदारांना ते थांबवू शकले नाही. कमलनाथ इंडिया आघाडीतील सदस्यांसोबत युती करण्यातही अयशस्वी ठरले. “अखिलेशबद्दलची सर्व चर्चा सोडा” त्यांच्या या विधानाने राष्ट्रीय स्तरावर मोठा परिणाम झाला. इंडिया आघाडीतील समाजवादी पक्ष (एसपी) आणि काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. कमलनाथ यांनी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी, त्यांनी हे वृत्त फेटाळलेही नाही. काँग्रेसकडून मात्र कमलनाथ भाजपात प्रवेश करणार नसल्याचे संगितले जात आहे.