आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कारण, कर्नाटक सरकारच्या मंत्र्याने टीपू सुलतानप्रमाणे विरोधी पक्ष काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना संपवण्याबाबतच्या आवाहन केले होते. कर्नाटकात या वर्षाच्या अखेरीस निवडणूक होणार आहे. मांड्या येथे एका सभेत बोलताना उच्च शिक्षणमंत्री सीएन अश्वथ नारायण यांनी म्हटले की, “तुम्हाला टीपू सुलतान हवा आहे की, सावरकर? आपण या टीपू सुलतानला कुठे पाठवलं? निंजे गौडा यांनी काय केलं? तुम्ही त्यांना (सिद्धरामय्यांना) तशाचप्रकारे संपवलं पाहिजे.”

उजव्या विचारसरणीच्या गटांनी असा दावा केला आहे की, टीपू सुलतान इंग्रजांसी लढताना मरण पावला नाही, तर त्याला उसी गौडा आणि निंजे गौडा या दोन वोक्कालिगा सरदरांना मारला. मात्र या मताशी काही इतिहासकार सहमत नाहीत. तर कर्नाटकाच्या मंत्र्याच्या या विधानानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसने अश्वथ नारायण यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे, ज्यांनी म्हटले आहे की टीपू सुल्तानला मानणाऱ्यांना कर्नाटकाच्या बाहेर काढलं पाहिजे.

सिद्धरामय्या यांनी नारायण यांच्यावर लोकांना त्यांना मारण्यासाठी भडकवण्याचा प्रयत्न केलाचा आआरोप केला आहे आणि मुख्यमंत्री बोम्मईंनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली आहे.

सिद्धरामय्या म्हणाले, “उच्च शिक्षणमंत्री अश्वथ नारायण यांनी लोकांना आवाहन केले आहे की, ज्याप्रकारे टीपू सुलतानला मारलं गेलं होतं, त्याचप्रकारे मलाही ठार करा. अश्वथ नारायण, लोकांना भडकवण्याचा का प्रयत्न करत आहत?, स्वत: बंदूक घेऊन या.” तसेच, “सिद्धरामय्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मंत्र्याविरोधात कोणतीच कारवाई केली गेली नाही. हे दिसून येत की बोम्मई, गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र आणि त्यांचे अकार्यक्षम मंत्रिमंडळ झोपा काढत आहे आणि अश्वथ नारायणबरोबर तडजोड करत आहेत. गुजरात भाजपाची संस्कृती कर्नाटक भाजपात आली आहे का? पंतप्रधान मोदी आताही गप्पच राहणार का, ज्याप्रकारे २००२(गुजरात दंगल) मध्ये गप्प होते. कन्नडिगा कधीच कर्नाटकास गुजरातसारखं होऊ देणार नाही.” असं सिद्धरामय्या म्हणाले आहेत.

दुसरीकडे मंत्री अश्वथ नारायण यांनी म्हटले की, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. त्यांनी स्पष्ट केले की, संपवा या त्यांच्या शब्दाचा अर्थ हा सिद्धरामय्यांना निवडणुकीत पराभूत करा असा होता. कोणतीही शारीरिक इजा पोहचवणे नाही. त्यांनी म्हटले की, मी सिद्धरामय्यांची तुलना टीपू सुलतानशी केली होती. मी सिद्धरामय्या यांच्या टीपू सुलतान यांच्याविषयीच्या प्रेमाबद्दलही बोललो होतो. मी सिद्धरामय्यांबद्दल अपमानकारक काहीच बोललो नव्हतो. मी नरसंहरासाठी जबाबदार असलेल्याचे गुणगाण आणि राज्यात बळजबरी धर्मांतरणावर टीका केली होती. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की आपल्याला काँग्रेसला हरवायचं आहे. माझे वैयक्तिकस्तरावर सिद्धरामय्यांसोबत काहीच मतभेद नाहीत. माझ्या त्यांच्याबरोबर राजकीय आणि वैचारीक मतभेद आहेत. माझ्या मनात त्यांच्याविषयी अनादर नाही. जर माझ्या वक्तव्यांमुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला माफ करा.