छत्रपती संभाजीनगर : विजयाचा रंग हिरवा की भगवा हा सनातन प्रश्न छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जीवंत रहावा यासाठी नुकतेच भाजप – एमआयएमचे कार्यकर्ते समोरा- समोर आले. त्यांनी घोषणाबाजी केली. ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सारख्या विदुषींनी केले त्या मतदारसंघाचा संघाची निवडणूक ‘हिंदू- मुस्लिम’ आणि ‘मराठा – ओबीसी’ अशी दुधारी व्हावी या प्रक्रियेला पुन्हा वेग दिला जात आहे.

उमेदवार निवडीच्या बैठका मुंबई -दिल्लीत सुरू झाल्या आहेत. भाजप- सेना युतीच्या फटाफुटीनंतर १८ व्या लोकसभेत भाजप आपला पहिला डाव आजमावणार आहे. उमेदवार ठरले नाहीत पण केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे बाशिंग बांधून तयार आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटात भांडत – वाद घालत सुरू असणाऱ्या कुरघोड्यामध्ये खैर की दानवे हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. ‘ हिंदुत्त्वा’ च्या प्रयोगशाळेत शेजारच्या जालना जिल्ह्यातून पेटलेल्या आरक्षण मुद्दयावर आपल्याच ‘पोळीवर तूप किंवा नळीवर रस्सा’ वाढून घेण्यासाठी सारे पक्ष पुढे आले आहेत. बिअरची निर्मिती अग्रेसर असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ‘ लोकशाही’ ची नशा चढू लागली आहे !

Amol Kirtikar challenge to Ravindra Waikar MP
वायकर यांच्या खासदारकीला अमोल कीर्तिकरांचे आव्हान
maharashtra legislative council marathi news
फुटलेल्‍या आमदारांमध्ये सुलभा खोडके यांच्या नावाची चर्चा…त्या म्हणाल्या, “स्थानिक राजकारण…”
all Parties Strategize Independently contest elections, Joint Battle, allied parties, Kolhapur Assembly Elections, Maharashtra assembly election 2024, Parties Strategize Independently contest elections in Kolhapur,
कोल्हापूरमध्ये सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी
Political discussion with Abdul Sattar Nagesh Patil Ashtikar visit to Mumbai
सत्तार, अष्टीकर आणि बांगर भेटीने चर्चेला उधाण
Wardha, victory, Lok Sabha,
लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे प्राधान्यात बदल, आता ‘हा’ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर
Sangli, Congress, Sharad Pawar group,
सांगलीत जागावाटपावरून काँग्रेस, शरद पवार गटात आतापासूनच कुरघोड्या सुरू
Chandrapur, bjp, congress, bjp Chandrapur Representatives, congress Chandrapur Representatives, Representatives Gear Up for Assembly Elections, maharasthra assembly 2024, Representatives started meeting to people, Chandrapur news, marathi news, Sudhir mungantiwar, koshore joregewar, Vijay waddetiwar , subhash dhote, Pratibha dhanorkar,
चंद्रपूर : गाठीभेटी, उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजनांचा धडाका; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी सक्रिय
Minister Khade, close relative,
पालकमंत्री खाडे यांच्या विरोधात त्यांच्या निकटवर्तीयाचाच उमेदवारीचा दावा

हेही वाचा : वायएस शर्मिला लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, आंध्र प्रदेशच्या राजकारणावर काय परिणाम होणार?

संभाजीनगर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता मतदारसंघ तर शरद पवार यांना राजकीय संदेश देण्यासाठीचे महत्त्वाचे ठिकाण. मात्र, राष्ट्रवादीने फुटीपूर्वी आणि नंतरही कधी या लोकसभा मतदारसंघात लक्ष घातले नाही. तर अल्पसंख्याकांची मते मिळावीत आणि ‘धर्मनिरपेक्ष’ आहोत हे सांगण्यासाठी काँग्रेसने मुस्लिम नेतृत्वाकडे दिलेले अधिकचे लक्ष यामुळे हिंदू मतपेढीला बळ मिळाले.

आता औरंगाबाद जिल्ह्याचे नाव आता छत्रपती संभाजीनगर झालेले आहे. राजकारणाचा पट अनेक पदरी झाला आहे. त्यात भर पडते आहे महाराजांची. गंगापूर, वैजापूर, कन्नड या भागांमध्ये महाराजांना बोलावणे, त्यांचे धार्मिक कार्यक्रम घडवून आणणे. त्या धार्मिक कार्यक्रमांमधून ‘प्रसाद’ वाटप करणे हे काम आवर्जून केले जात आहे. बागेश्वरधामच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांनी ही सुरुवात केली. तत्पूर्वी बँक कर्जाच्या माध्यमातून लाभार्थी मतदार करण्याची प्रक्रिया त्यांनी जोरदारपणे हाती घेतली होती. भाजपने अनेक प्रकारच्या चाळण्या लावून बांधणीला वेग दिला. निवडणुकीच्या १५ महिने आधीपासून केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. धोरणे आखली. केंद्रीय योजनांच्या लाभार्थींना मतदार बनविण्याचे प्रयत्नही त्यांनी घडवून आणले. पण भाजपचा उमेदवार कोण या प्रश्नाचे उत्तर ना मंत्री डॉ. कराड यांचेकडे आहे ना त्यांच्या अन्य सहकाऱ्यांकडे. ‘ आमचे सगळे वरून ठरते’ हे नव्याने आलेले कार्यकर्तेही आता सांगत आहेत. राजकीय पटमांडणीत आपण सुरक्षित रहावे अशी व्यूहरचना करुन प्रत्येक जण डावपेच आखू लागला आहे.

हेही वाचा : नाशिकमधील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशासाठी शिंदे गटापाठोपाठ भाजपचाही जोर

जात, धर्म आणि प्रभावी भाषणांचा खेळ

खडकी, कुजिश्ता बुनियाद , फत्तेनगर, औरंगाबाद, संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर अशी गावांची नावे विविध सत्ताधाऱ्यांनी बदलली. त्यामुळे देशभरातील सर्व जाती- धर्माचे लोक या शहरात राहतात. त्यामुळे जातीचा प्रभाव लक्षात घेऊन युती – आघाडीचे गणिते मांडली जातात. लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची टक्केवारी २१ ते २२ टक्के एवढी. तर अनुसुचित जाती- जमातीची संख्या १९ ते २० टक्के. त्यामुळे एमआयएम आणि वंचित यांच्या युतीमध्ये इम्तियाज जलील निवडून आले. आता ही तुटली आहे. पण एमआयएमकडे पण अजूनही एक हत्यार आहे ते म्हणजे प्रभावी भाषणाची शैली. ‘ इस जमीन में अजीब सा सुकुन है, ये मेरे मालिक अगर मुझे मौत मिले तो इसी जमीन पर मिले और मुझे भि दो गज जमीन यही चाहिये’ या ओवेसी यांच्या भाषणाने मतदार भावनिक झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांना हे शहर त्यांना फार आवडते, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थक अजूनही सांगत असतात. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या त्यांच्या सभेच्या गर्दीवरुन निवडणुकीची गणिते ताडून पाहिले जातात.

भाषणांतून प्रभाव निर्माण करणारे बापूसाहेब काळदाते यांनीही या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. पण २०१९ पासून मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर झालेले मराठा मोर्चे आणि त्यातून निर्माण होणारा एकगठ्ठा जातीचा मतदार यश मिळवून देऊ शकतो, असे चित्र रंगवले जात आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या सारखा प्रयोग पुन्हा झाला तर मराठा आणि ओबीसी असा खेळ पुन्हा मांडला जाऊ शकतो. या नव्या खेळात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा प्रयत्न असेल तो पुन्हा ‘ पन्नास खोके’ या घोषणेच्या सहानुभूतीची लाट निर्माण होईल असा. कारण कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत वगळता सर्वजण मुख्यमंत्री शिंदे गटाकडे वळले आहे. मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, संजय शिरसाठ यांची ताकद युतीला मिळेल असा दावा केला जात आहे. नव्या गणितात हिरवा- भगवा रंग भरला जात आहे.

हेही वाचा : विकसित भारत संकल्प यात्रेवरून सिंधुदुर्गात वातावरण तापले

२०१९ मधील प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

उमेदवाराचे नाव (पक्षाचे नाव) – मिळालेली मते

इत्मियाज जलील (एमआयएम) – ३८८७८४
चंद्रकांत खैरे (शिवसेना-भाजप) – ३८४५५०
हर्षवर्धन जाधव (अपक्ष) – २८३७९८
सुभाष झांबड (काँग्रेस) – ९१६८८

असा आहे विजयाचा इतिहास

१९७१ ते २०१९ या कालावधीत शिवसेना-भाजपा युती सात वेळा, काँग्रेस-तीन वेळा, जनता पार्टी-एक वेळ, एस काँग्रेस-एक वेळ, एआयएमआयएम-एक वेळ