नांदेड : नांदेड हा पारंपारिकदृष्ट्या काँग्रेसचा गड. पण गेल्या लोकसभा निवडणुकीतच काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा या मतदारसंघात पराभव झाला. मधल्या काळात अशोकरावांच्या पक्षांतराच्या वावड्या सततच सुरू राहिल्या आणि त्यांचा त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मिळविलेला हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी भाजपने जोर लावला असतानाच गत वेळच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी अशोक चव्हाणही सज्ज झाले आहेत. यामुळे नांदेडमध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.

माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांची पूर्वपुण्याई आणि त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी जपलेला पक्षनिष्ठेचा वारसा यामुळे काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रातून ज्या मतदारसंघांमध्ये यशाची अपेक्षा आहे, त्यात नांदेडचे नाव वरच्या स्थानावर आहे. गेल्या लोकसभेत निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव करणारे प्रताप चिखलीकरांना ‘जायंट किलर’ संबोधले गेले, तरी महाराष्ट्र विधानसभेतून लोकसभेच्या सभागृहात गेल्यानंतर या नव्या भूमिकेशी त्यांना जुळवून घेता आले नाही. त्यांना चव्हाणांविरुद्ध उभे करण्याची योजना देवेन्द्र फडणवीस यांची होती, ती अनपेक्षितपणे यशस्वी झाली. चिखलीकर यांनी गेल्या ५ वर्षांत रेल्वेविषयक महत्त्वाच्या मागण्या लावण्यात योगदान दिले. जिल्ह्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांसाठी निधी मिळवला. पण केंद्र किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून कोणताही मोठा प्रकल्प त्यांना नांदेडमध्ये आणता आला नाही.

Eknath Shinde and Ajit Pawar group will not get a single Lok Sabha seat says Sachin Sawant
लोकसभेची एकही जागा एकनाथ शिंदे, अजित पवार गटाला मिळणार नाही; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा दावा
Sangli Lok Sabha, Sangli,
सांगलीत काँग्रेस आमदारांची झाली पंचाईत
Deputy Chief Minister Ajit Pawar also applied for Lok Sabha from Baramati
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही बारामतीतून लोकसभेसाठी अर्ज… झाले काय?
congress leadership in delhi advised maharashtra leaders to follow alliance rule
आघाडी धर्माचे पालन करा! पक्षनेतृत्वाचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला

हेही वाचा : भाजप अन् RSSच्या राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाला जाण्यास काँग्रेसचा नकार; ममता अन् मायावतींची भूमिका काय?

यशाचा इतिहास

१९६२ पासूनच्या १६ निवडणुकांकडे पाहिल्यास नांदेडमध्ये काँग्रेस विरोधकांनी चारवेळा यश मिळविले, तरी कोणत्याही दोन सलग निवडणुकांत त्यांना यश मिळाले नाही तसेच काँग्रेस पक्षही सलग दोन निवडणुकांत कधीही पराभूत झाला नाही. ही बाब लक्षात घेता येणारी निवडणूक भाजपसाठी परंपरा खंडित करण्याची आहे तर नांदेडमध्ये सलग दुसरऱ्यांदा पराभव होणार नाही याची खबरदारी काँग्रेसला घ्यावी लागणार असून पूर्वीची परंपरा जपण्याची संधी या पक्षालाही आहे.

नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांत निवडणुकीच्या दृष्टीने वातावरणनिर्मिती तयार सुरू झाली. आता पुढील काही आठवड्यांत विशेषतः अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर या वातावरणात वेगवेगळे रंग भरण्याचे काम भाजपकडून सुरू होईल. त्या पद्धतीने या पक्षाकडून नियोजन सुरू झालेले आहे. प्रभू रामाचा गजर आतापासूनच केला जात आहे. अशा भडक वातावरणात मतदारांचे लक्ष आपल्या व आपल्या उमेदवाराकडे वेधून घेण्यासाठी जी पूर्वतयारी असावी लागते ती काँग्रेस पक्षात अद्याप सुरू झालेली नाही, असे दिसते. मागील काही निवडणुकांप्रमाणेच यंदाही भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्येच नांदेडमध्ये लढत होणार हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. काँग्रेसकडून पहिल्या टप्प्यात माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या स्नुषा डॉ.मीनल पाटील यांचे नाव राज्य पातळीपर्यंत गेलेले आहे. पण काँग्रेसश्रेष्ठी अशोक चव्हाण यांनाच निवडणूक लढविण्याची गळ घालू शकतात, असे पक्षातील जाणकारांचे म्हणणे आहे. भाजपची उमेदवारी कोणालाही मिळाली, तरी या पक्षाची आणि उमेदवाराची खरी लढत अशोक चव्हाण यांच्याशीच होणार आहे. भाजपमध्ये विद्यमान खासदारांना उमेदवारी नको, असे पक्षाच्या काही आमदारांकडूनच नेतृत्वाला सांगितले गेले असले, तरी खुद्द चिखलीकर हे आपल्या उमेदवारीच्या बाबतीत खात्री बाळगून आहेत. काही बैठकांतून त्यांनी आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचेही जाहीर केले, पण नांदेडमधील उमेदवाराच्या बाबतीत भाजप नेते व्यापक चाचपणी करून ही जागा सलग दुसर्यांदा जिंकण्याची जुळवाजुळव करत आहेत. चिखलीकरांसह अन्य काही पर्यायांचाही पक्षात विचार होत आहे.

हेही वाचा : शिंदे यांच्या बाजूने निकाल लागल्याने अजित पवार गट निश्चिंत

नांदेडमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्याचे अशोक चव्हाण यांच्यासमोर आव्हान असेल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते व खात्याचा त्यांनी जिल्ह्यात उपयोग करून घेतला. अशोकराव भाजपमध्ये जाणार ही चर्च मधल्या काळात जोरदार रंगली. अर्थात, अशोकारांवी त्याचा इन्कारही केला. पण यातून चव्हाणांबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले होते.

महाराष्ट्रात एमआयएमचा विस्तार झाला नांदेडपासून. नांदेडमधील मुस्लीम मते काँग्रेससाठी निर्णायक असतात. एमआयएम किती मतांचे विभाजन करते हे महत्त्वाचे आहे. गेल्या वेळी वंचित- एमआयएम आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक मतांमुळे अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. यामुळेच यंदा किती मतांचे विभाजन होते यावरही निकाल अवलंबून असेल.

हेही वाचा : अयोध्या राम मंदिर: सोहळ्याआधीच रामलल्लाचे दर्शन घेण्याचा यूपी काँग्रेसचा निर्णय, तारीखही ठरली, ‘हे’ आहे त्यामागचे कारण… 

लोकसभा निवडणुकीचा आलेख निवडणुकांचा लेखाजोखा बघितला, तर नांदेड मतदारसंघात विशिष्ट अंतराने काँग्रेस पक्षाला पराभवाची चव चाखावी लागली. यांतील पहिला पराभव १९७७च्या जनता लाटेत नोंदला गेला. शंकरराव तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते, तरी देशभरातील इंदिरा गांधीविरोधी वातावरणामुळे नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवार प्राचार्य गो. रा. म्हैसेकर यांचा पराभव झाला. त्यानंतर १२ वर्षांनी १९८९च्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव करून जनता दलाच्या डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी इतिहास घडविला होता. तत्पूर्वी १९८७च्या पोटनिवडणुकीत थेट खासदारकीद्वारे अशोकरावांचे वयाच्या तिशीमध्ये राजकीय पदार्पण झाले होेते. या निवडणुकीत त्यांनी अॅड.प्रकाश आंबेडकर यांना पराभूत केले. तीन दशकातील आठ निवडणुका १९८९ ते २०१९ या तीन दशकांदरम्यान झालेल्या लोकसभेच्या आठ निवडणुकांपैकी ६ निवडणुकांत काँग्रेस पक्षाने नांदेडची जागा जिंकली, पण भास्करराव खतगावकर (२००४) आणि अशोक चव्हाण (२०१९) हे दोन दिग्गज नेते पराभूत झाल्याचेही दिसले. १९९० नंतर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस विरोधात भाजप-शिवसेना युतीने मोठे आव्हान उभे केले, तरी १९९५-१९९९ दरम्यान या युतीची महाराष्ट्रात सत्ता असतानाही १९९६ आणि नंतरच्या दोन मध्यावधी निवडणुकांत काँग्रेस पक्षाने नांदेड लोकसभेची जागा राखताना भाजपच्या धनाजीराव देशमुख यांच्या पराभवाची हॅटट्रिक केली. वरील तीन निवडणुकांत देशाच्या अनेक भागांसह महाराष्ट्रातही भाजप-सेना युतीचा झंझावात निर्माण झाला होता, तरीही नांदेडमधील काँग्रेस नेतृत्वाने तीनही निवडणुकांत सफाईदार यश प्राप्त केले होते. १९९६ साली शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी लोकसभेत जाण्यासाठी नांदेड मतदारसंघाची निवड करून सबंध देशाचे लक्ष वेधून घेतले होते, पण त्यांचा हा प्रयत्न काँग्रेसने अयशस्वी ठरविला. शंकरराव चव्हाण यांच्या निधनानंतर कॉग्रेसला धक्का २००४ साली काँग्रेसचे दिग्गज नेते शंकरराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यानंतर ३ महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शंकररावांचे जामात भास्करराव पाटील यांना पराभूत करून मतदारांनी काँग्रेसला चार निवडणुकांनंतर मोठा धक्का दिला. वस्तुतः भाजपने दिलेला उमेदवार खतगावकरांच्या तुलनेत प्रभावी नव्हता, पण काँग्रेसच्या पारंपरिक मतांचे विभाजन व्हावे, अशी व्यवस्था तेव्हा केली गेली. निवडणूक रिंगणात उतरलेल्या वहिदाभाभी आणि सुरेश गायकवाड यांनी काँग्रेसच्या पराभवाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावला. २००९ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे खतगावकर आणि अशोक चव्हाण यांनी भाजपला सहज नमविले. २०१४ मध्ये मोदी लाट अवतरली होती, तरी चव्हाण यांनी भाजपचा विजयी रथ नांदेडमध्ये रोखला होता. पण २०१९ साली काँग्रेसतर्फे पुन्हा चव्हाण आणि भाजपतर्फे चव्हाणांचे काँग्रेसमधील समर्थक प्रताप पाटील चिखलीकर अशी लढत होत असताना, प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आणि एमआयएम युतीच्या नवख्या उमेदवाराने अपेक्षेपेक्षा खूप जास्त मते घेत अशोकरावांसारख्या मातब्बर नेत्याला पराभवाचा धक्का बसला.

हेही वाचा : Rahul Narvekar : महाराष्ट्राच्या राजकारणाचा मोठा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या हाती; कोण आहेत राहुल नार्वेकर?

२०१९ च्या निवडणुकीतील मते

प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) – ४,८६,८०६

अशोक चव्हाण (काँग्रेस) – ४,४६,६५८

यशपाल भिंगे (वंचित आघाडी) – १,६६,१९६ …