छत्रपती संभाजीनगर : तिरंगी लढतीमध्ये हिंदू मताचे विभाजन व्हावे आणि दलित व मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण व्हावे, या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकारणात निर्णायक भूमिका घेऊ शकणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला मुस्लिम मतदारांची गर्दी कमी दिसून आली. ‘युती धर्म पाळता येत नसेल तर युती करू नका,’ या शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी ‘एमआयएम’ ला फटकारले. आता मत देताना चूक केली तर मुस्लिम सर्वसमावेश व्हायला तयार नाहीत, असा संदेश जाईल. शिवाय माणूस कितीही चूक असेल धर्म म्हणून आम्ही त्याच्याच पाठिशी उभे राहणार असा संदेश जात राहील. मुस्लिमांना सर्वसमावेशकता मंजूर नाही, हेही स्पष्ट होईल. त्यामुळे या वेळी मतदान करताना चूक करू नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिमांना केले. शिवसेना, काँग्रेस हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष नाहीत, हेही सांगायला ते विसरले नाहीत.

२०१९ च्या निवडणुकीमध्ये ‘एमआयएम’ आणि बहुजन वंचित आघाडीची युती असल्यामुळे खासदार इम्तियाज जलील निवडून आले होते. गेल्या निवडणुकीतील युती तुटल्यानंतर त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले. ‘ युती’ चा धर्म पाळता येत नसेल तर युती करू नका असे त्यांनी सुनावले. मुस्लिम समाज मतदान करताना चूक करतो, असा त्यांच्या भाषणाचा सूर होता. ते म्हणाले, ‘ मुस्लिमांना अन्य समाज स्वीकारत नाहीत, असा उगीच समज होता. आता एका समाजाच्या आधारे निवडणुका जिंकता येत नाहीत. सर्वसमावेश व्हावे लागते. पण तसे न करता व्यक्ती चुकीचा आहे पण आपल्याच धर्मातील आहे, अशी जर मुस्लिम कार्यकर्त्याची भूमिका असते. चूक ओवेसीची असेल किंवा अन्य कोणाची हे जर मुस्लिम कार्यकर्ते सांगू शकत नसतील तर ती भूमिका चूक ठरेल. मुस्लिम ती करत आहेत. पूर्वीही ‘ एमआयएम’ चा उमेदवार निवडून आला तो ‘ ओबीसी’ च्या मतांवर निवडून आला. पण त्यांनी नंतर वंचितच्या पाठित खंजीर खुपसला.’ आता पुन्हा एकदा मुस्लिम उमेदवार वंचित बहुजन आघाडीने मैदानात उतरवला आहे. पण आमखास मैदानातील गर्दीत वंचित बहुजन आघाडीचे पारंपरिक मतदारच अधिक दिसून येत होते.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
Image of Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate: “वक्फ बोर्डाच्या नावाखाली घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीचा ताबा परत घेणार”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

हेही वाचा…मराठा आंदोलकांच्या रोषाचा रावसाहेब दानवे यांनाही फटका

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणूक वजाबाकीच्या तीन पदराची आहे. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा पैठण मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात असल्याने त्यांच्या हक्काचे मतदान त्यांच्या बाजूने नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे भाजप- शिवसेना युती असताना चार वेळा निवडून आले होते. आता त्यांच्या पारड्यातून भाजपचे मतदान वजा आहे. एमआयएम बरोबर वंचित बहुजन आघाडी नसल्याने ‘ एमआयएम’ मधूनही मतांची वजाबाकी झालेली आहे. त्यामुळे आपल्या बाजूने जातीय मतपेढी ओढली जावी असे प्रयत्न करत असताना वंचितने पुन्हा एकदा ‘एमआयएम’ फटकारले आहे.

हेही वाचा…अमेठी, रायबरेली आणि वायनाडबाबतच्या निर्णयातून काँग्रेसला नेमके काय साधायचे आहे?

भाजप – ठाकरे गटात नव्या समीकरणाची नांदी

उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. संकटात त्यांच्या मदतीला धाऊन जाईन’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य पुढील राजकारणाची नांदी आहे. गेली पंधरा वर्षे जी मंडळी भाजपच्या मांडीला मांडी लाऊन बसली होती. ती अचानक एका रात्रीतून धर्मनिरपेक्ष कशी होतील. काँग्रेसही धर्मनिरपेक्ष नाही आणि शिवसेनाही असे सांगत प्रकाश आंबेडकरांनी राजकीय पटलावर सर्व पक्षीय घराणेशाही असल्याचे आरोप केला. ते म्हणाले, सध्याच्या निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षाचे बहुतांश उमेदवार प्रस्थापित मराठा आहेत. घराणेशाहीतील आहेत. ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते जरांगे पाटील यांनी समोर आणलेले मराठेही नाहीत. त्यामुळे या सत्तेच्या राजकारणाला ओळखण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले. त्यांच्या टीकेचा जोर काँग्रेसवरही अधिक होता.

Story img Loader