येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश आणि केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीतर्फे सुरू असून उत्तर प्रदेश काँग्रेस मात्र द्विधा मन:स्थितीत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाने या सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी प्रदेश काँग्रेसने मकर संक्रातीचे औचित्य साधून रामलल्लाचे दर्शन १५ जानेवारी रोजीच घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणीसही त्यांनी सुरुवात केली आहे.

गमावलेली हिंदू मतपेटी पुन्हा सावरण्याचा प्रयत्न म्हणून काँग्रेसच्या या मोहिमेकडे पाहिले जात आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे काँग्रेसच्या तीन सर्वोच्च नेत्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. यात काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला.

Narendra Modi criticism that it is a ploy by Congress to implement the Karnataka model for Muslims
ओबीसी आरक्षणाला धोका! मुस्लिमांसाठीचे कर्नाटक प्रारूप लागू करण्याचा काँग्रेसचा डाव : मोदी
narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Sangli, Vishal Patil, vishal patil sangli,
सांगलीची जागा कॉंग्रेसलाच मिळेल, विशाल पाटलांचा विश्वास; खासदार संजयकाका पाटलांना मैदानात येण्याचे आव्हान

उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाज हा दीर्घकाळ काँग्रेसबरोबर होता. मात्र गेल्या काही वर्षांत या समाजाने भाजपाबरोबर जाणे पसंद केले आहे. मतदारांमध्ये १२ टक्क्यांहून अधिक ब्राह्मण समाज आहे. त्यामुळे राम मंदिराचा सोहळा हे या समाजाला पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळविण्यासाठीचे निमित्त असू शकते, असा मतप्रवाह उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये आहे. त्यासाठी पक्षाने ‘सौम्य हिंदुत्त्वा’ची भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी ‘यूपी जोडो’ यात्रेला सहारणपूर येथील माँ शाकंभरी देवी मंदिरातून २० डिसेंबर रोजी सुरुवात केली. देवबंद परिसरातून यात्रा पुढे जात असताना त्यांनी स्थानिक मुस्लीम नेत्यांच्याही गाठीभेटी घेतल्या.

सीतापूरच्या नैमिषारण्य हिंदू मंदिरामध्ये या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप व्हावयाचा होता. मात्र ६ जानेवारी रोजी लखनौच्या शहीद स्मारकाजवळ त्याचा समारंभपूर्वक समारोप पार पडला. या सोहळ्याला अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये उत्तर प्रदेशची जबाबदारी असलेले अविनाश पांडे हेही जातीने उपस्थित होते. अलीकडेच काँग्रेसाध्यक्ष खरगे यांनी पांडे यांच्याकडे उत्तर प्रदेशची धुरा सोपवली. शहीद स्मारकाला भेट देण्यापूर्वी पांडे यांनी लखनौमधील प्रसिद्ध हनुमान मंदिरास भेट देऊन तेथे पूजा केली. त्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेस कार्यालयाला भेट देऊन त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या.

दुसऱ्याच दिवशी पांडे यांनी घोषणा केली की, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजय राय, पी. एल. पुनिया, प्रमोद तिवारी, काँग्रेसच्या राज्य विधानसभेच्या नेत्या आराधना मिश्रा, माजी प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू आणि ब्रीज लाल खबरी येत्या १५ जानेवारी रोजी अयोध्येला जाऊन जुन्या मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. रामलल्लाचे दर्शन घेण्याचा निर्णय त्यांनी यापूर्वीच घेतला होता. मात्र पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही दर्शनासाठी बरोबर येण्याचा मानस व्यक्त केल्याने कार्यक्रमात बदल करून त्यांना १५ जानेवारी ही नवीन तारीख जाहीर करावी लागली. काँग्रेसचे राज्यभरातील सुमारे १०० पदाधिकारी हेही त्या दिवशी जुन्या राममंदिरात विराजमान रामलल्लाचे दर्शन घेतील, अशी माहिती प्रदेश काँग्रेसतर्फे देण्यात आली. या दरम्यान, पत्रकारांशी संवांद साधताना पांडे यांनी भाजपावर शरसंधान केले. ते म्हणाले, काँग्रेस हा श्रद्धेचा सन्मान करणारा पक्ष आहे. तर काही पक्ष मात्र श्रद्धेचे राजकारण करण्यात धन्यता मानतात.

राय हे उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा असून वाराणशीतील पुजाऱ्यांमध्येही प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले, काँग्रेस नेत्यांनी यापूर्वीही मंदिरांना अनेकदा भेटी दिलेल्या आहेत, त्यामुळे यात नवीन काहीच नाही. इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना ते म्हणाले, “पूर्वीपासूनच आम्ही रामलल्लाचे दर्शन घेत आलो आहोत. या खेपेस मकर संक्रांतीचा अपूर्व योग जुळून आला आहे इतकेच. जुन्या मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेण्याची सोय असताना नवे मंदिर, नवीन मूर्ती यांची गरजच काय?” असा सवालही राय यांनी केला.
दरम्यान, फैझाबादचे माजी काँग्रेस खासदार निर्मल खत्री यांनाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र त्यांच्या सोहळ्यातील उपस्थितीविषयी काहीही समजू शकले नाही.

दरम्यान, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाने २२ जानेवारीच्या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळेच हिंदू मतपेटी गमावू नये या हेतूने त्यांनी १५जानेवारी रोजी दर्शन घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती नाव उघड न करण्याच्या तत्त्वावर प्रदेश काँग्रेसच्या एका नेत्याने दिली.