बाळासाहेब जवळकर

पिंपरी-मैदानी खेळांची आवड असणारा, कोणत्याही क्रीडाप्रकारांतील खेळाडू असो, त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारा, शक्य होईल तितकी खेळाडूंना मदत करणारा क्रीडाप्रेमी, अशी भोसरीचे पैलवान आमदार महेश लांडगे यांचीओळख. ‘महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील अनेक गरजवंतांना वेळोवेळी मदत केली आहे. ‘इंद्रायणीथडी जत्रा’सारखे अनेक भव्यदिव्य, अराजकीय उपक्रमही त्यांनी राबवले आहेत. महेश लांडगे शेतकरी कुटुंबातील असून पदवीधर आहेत. कबड्डी, कुस्तीप्रमाणेच बैलगाडा शर्यतींची त्यांना आवड आहे. विद्यार्थीदशेत असताना एन. एस. यू. आय.च्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. पुढे पिंपरी काँग्रेसचे शहराध्यक्षपद भूषवले. २००२ च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडूनच पहिली निवडणूक लढवली. तेव्हा ते विलास लांडे यांच्याकडून पराभूत झाले. २००४ मध्ये लांडे ‘हवेली’ विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. तेव्हा त्यांनी स्वत:च्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेवर पोटनिवडणूक झाली. त्यावेळी महेश लांडगे नगरसेवक म्हणून निवडून आले, मात्र तेव्हा ते राष्ट्रवादीकडून लढले होते. नगरसेवकपदापासून सुरू झालेला लांडगे यांचा राजकीय प्रवास अव्याहतपणे सुरू आहे.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?

हेही वाचा… तेजस्वी बारब्दे : ग्रामविकासाचा ध्यास

पिंपरी पालिकेवर ते सलग तीन वेळा निवडून आले. २०१३-१४ मध्ये त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. या काळात भोसरी परिसरातील गावांमध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडे भोसरी विधानसभेसाठी उमेदवारी मागितली, मात्र तेव्हाही विलास लांडे यांनाच उमेदवारी मिळाली. तत्कालीन परिस्थितीत लांडगे यांचे तरूण वर्गात आकर्षण होते. त्यामुळेच मोदी लाटेचे वातावरण असतानाही ते अपक्ष निवडून आले. लांडे यांच्यासह दिग्गज नेत्यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर लांडगे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा… श्रद्धा ठाकूर : कुशल संघटक

पिंपरी पालिकेच्या २०१७ मध्ये निवडणुका झाल्या, तेव्हा लांडगे यांचा करिश्मा पुन्हा दिसून आला. त्यांच्या भोसरी विधानसभा क्षेत्रातील जवळपास ४० जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले. या पट्टयातून शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पिंपरी पालिकेची सत्ता भाजपकडे आली, त्याचे श्रेय भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्याइतकेच आमदार महेश लांडगे यांनाही जाते. पालिकेच्या माध्यमातून भोसरीत झालेली भरीव कामे आणि पाच वर्षांत मतदारसंघावरच लक्ष केंद्रित केल्याने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लांडगे पुन्हा विजयी झाले. यावेळी त्यांनी विलास लांडे यांचा ७५ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. खेड, चाकण, आळंदी, मंचर आदी ठिकाणी त्यांनी उत्तम संघटनात्मक काम केले आहे. पिंपरी पालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे. याही वेळी पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा भाजपचा निर्धार आहे. लांडगे यांच्याकडे भाजपचे शहराध्यक्षपद आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीशी दोन हात करायचे असल्याने लांडगे यांना मंत्रीपदाची ताकद गरजेची आहे, असा सूर भाजप वर्तुळात आहे.