गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रेटिक आझाद पार्टी अर्थात DAP या पक्षाला झटका लागला आहे. ३० हून अधिक संस्थापक सदस्यांनी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या ३० जणांमध्ये पक्षाचे सरचिटणीस निजामुद्दीन खटाना यांचांही समावेश आहे. गुलाम नबी आझाद यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. आपल्या पक्षाच्या नोंदणीसाठी गुलाम नबी आझाद निवडणूक आयोगात बोलावलं आहे. त्याचदिवशी ही घटना समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

DAP च्या एका वरिष्ठ नेत्याने इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे की गुलाम नबी आझाद यांना मंगळवारी निवडणूक आयोगात बोलावलं होतं. डेमोक्रेटिक आझाद पार्टी हे नावही लोकांनी दिलं आहे. या नावावर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब होणं बाकी आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 30 dap founding members to join cong today as azad meets ec for party registration scj
First published on: 17-01-2023 at 19:08 IST