नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या मुद्य्यावरून भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाकडे तत्काळ लक्ष दिले पाहिजे. याशिवाय त्यांनी हेही सांगितले की, काश्मिरी पंडितांच्या लक्षित हत्या आणि अल्पसंख्याक हिंदूंचे पलायन या मुद्य्यांवर एक सर्वपक्षीय बैठक बोलावली गेली पाहिजे. पंतप्रधान नाहीतर किमान उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

Russia -Ukraine war : युक्रेनमध्ये अणवस्त्रे वापरण्याचा मॉस्कोचा विचार नाही – पुतिन यांचं विधान!

अब्दुल्ला म्हणाले, “जर या प्रकरणी तत्काळ काही केलं गेलं नाहीतर येणाऱ्या दिवसांमध्ये काश्मीर १०० टक्के हिंदू रहित होऊ शकतो. काश्मिरी पंडितांसाठी १९९० सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. मी हत्यांसाठी जबाबदार नाही. मी कोणतही दहशतवादाला समर्थन करणारं विधान केलेलं नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारच्या दाव्याचा पर्दाफाश –

याशिवाय “काश्मीरमध्ये सामान्य परिस्थिती असल्याच्या केंद्र सरकारच्या मोठाल्या दाव्या पर्दाफाश झाला आहे. मी सरकारला सूचना करायला तयार आहे. मात्र सरकारने पहिलं पाऊल उचलायला हवं आणि सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. मी घाबरलेल्या काश्मिरी पंडितांना भेटण्यास जाईन.” असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी ब्रिटनमध्ये ऋषी सुनुक हे पंतप्रधान झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना अब्दुल्ला यांनी म्हटले की, “भारतात कधीच कोणता मुस्लीम व्यक्ती पंतप्रधान झालेला नाही. मात्र अशीही वेळ येईल जेव्हा मुसलमान व्यक्ती भारताचा पंतप्रधान बनेल.”