काही दिवसांपूर्वी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिणीला अटक करण्यात आली होती. वाय एस शर्मिला असे त्यांचे नाव आहे. तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात वाय एस शर्मिला यांचे समर्थक आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीच्या ( टीआरएस ) कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. याप्रकरणी वाय एस शर्मिला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

वाय एस शर्मिला यांचा वाय एस आर तेलंगणा पक्ष आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून त्यांनी तेलंगणात पद यात्रा काढली आहे. आतापर्यंत शर्मिला यांच्या पदयात्रेने ३ हजार ५०० किलोमीटरचे अंतर पार केलं आहे. त्यात २७ नोव्हेंबरला शर्मिला या वारंगल जिल्ह्यातील नरसांपेत होत्या. तेव्हा जनतेला संबोधित करताना शर्मिला यांनी स्थानिक टीआरएस आमदार पेड्डी सुदर्शन रेड्डी यांच्यावर टीका केली होती.

हेही वाचा : हम साथ साथ है! शस्त्रक्रिया होताना लालू प्रसादांच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब, मुलीने केली किडनी दान

वाय एस शर्मिला यांनी केलेल्या टीकेनंतर टीआरएसचे कार्यकर्ते संतप्त झाले. टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी वाय एस शर्मिला यांच्या पदयात्रेतील वाहनांवर हल्ला करत जाळपोळ केली. यानंतर शर्मिला यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि टीआरएसच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांची झटापट झाली. यानंतर शर्मिला आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्राचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडे शर्मिला यांच्याकडे विचारपूस केली आहे. सोमवारी ( ५ डिसेंबर ) जी-२० संबंधात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री रेड्डी सुद्धा उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शर्मिला यांना अटक करण्याबाबत रेड्डी यांना विचारलं. यावर रेड्डी आश्चर्यचकित होऊन फक्त हसले. पण, यावरती रेड्डी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असं ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या उपस्थित असलेल्या प्रतिनिधीने सांगितलं.

हेही वाचा : एक्झिट पोलचे अंदाज किती खरे किती खोटे? अरविंद केजरीवाल यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “मतमोजणी होईपर्यंत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाय एस शर्मिला पदयात्रा का काढत आहेत?

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी कालेश्वर येथील भूपालपल्लीमध्ये ‘कालेश्वरम सिंचन योजना’ हीचे लोकार्पण केलं होतं. गोदावरी नदीवर असलेल्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शर्मिला यांनी केला. त्याच पार्श्वभूमीवर ७ ऑक्टोबरपासून शर्मिला यांनी राज्यातील तेलंगणा राष्ट्र समिती ( टीआरएस ) विरोधात यात्रा सुरु केली आहे. २७ नोव्हेंबरला शर्मिला यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा तेलंगणातील ७५ विधानसभा क्षेत्रातून या यात्रेने प्रवास केला होता. आतापर्यत तीन हजार ५०० किलोमीटरच्यावर यात्रेने प्रवास केला आहे.