देशात २०२३ मध्ये ९ राज्यांच्या विधानसभा आणि २०२४ साली लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सखोल रणनिती ठरवण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी भाजपाचे राष्ट्रीय मंथन पार पडलं. तेव्हा मतांची अपेक्षा न ठेवता मुस्लिमांसह अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहचण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना केलं. तसेच, लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला मजबूत करण्यासाठी विविध सूचनाही पंतप्रधानांनी केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, “मतांची अपेक्षा न ठेवता भाजपा कार्यकर्त्यांनी मुस्लीम व्यावसायिक, बोहरा आणि पसमंदा मुस्लीम समुदायातील लोकांना भेटावं. तसेच, विद्यापीठ, चर्चला भेट द्या. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेअंतर्गत सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य करावं.”

हेही वाचा : राहुल गांधी काश्मीरमध्ये पोहचण्यापूर्वीच काँग्रेसला झटका, प्रवक्त्या दीपिका पुष्कर नाथ यांची ‘या’ कारणामुळे पक्षाला सोडचिठ्ठी

“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ४०० दिवस शिल्लक आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी झोकून देत काम करावे. तसेच, १८ ते २५ वयोगटातील तरुणांना भारताच्या राजकीय इतिहासाची पार्श्वभूमी माहिती नाही. मागील सरकारच्या काळात झालेला भ्रष्टाचार आणि चुकीच्या कामांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे,” असेही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

हेही वाचा : “पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारताचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं”; निर्मला सीतारामण यांची स्तुतीसुमने

तसेच, चित्रपटांवरून सुरु असलेल्या वादावरही पंतप्रधान मोदींनी भाष्य करत भाजपा नेत्यांना सल्ला दिला आहे. “आपण दिवसभर काम करत असतो. तर, काहीजण चित्रपटांबद्दल विधान करत असतात. याची दिवसभर माध्यमांत चर्चा होत राहते. त्यामुळे नेत्यांनी चित्रपटाबद्दल अनावश्यक वक्तव्य करण्यापासून दूर राहिलं पाहिजे,” असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, “आपण दुशासनाकडून सुशानाकडे कसे आलो? हे तरुणांपर्यंत पोहचवलं पाहिजे. मतांची काळजी न करता देश आणि समाज बदलण्याचं काम करावे. जसे ‘बेटी बचाओ’ मोहीम यशस्वी केली. त्याच पद्धतीने ‘पृथ्वी बचाव’ मोहीम राबवावी लागणार आहे. खतांच्या अतिवापर, हवामानात होणारे बदल कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं मोदींनी सांगितलं,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi connect with muslims advice to bjp worker 400 days before 2024 polls ssa
First published on: 18-01-2023 at 14:52 IST