दिल्लीतील एनडीएम कन्व्हेन्शन सेंटर येथे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच पक्षाला गुजरात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानण्यात आले. दरम्यान, बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाकडून काँग्रेससह विरोधीपक्षांवर जोरदार टीकाही करण्यात करण्यात आली.

या संदर्भात बोलताना, भाजपा नेत्या तथा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणल्या, ”भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकरिणीच्या दोन दिवसीय बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी कायदा मंत्री किरण रिजीजू यांनी राजकीय ठरावदेखील मांडला. या ठरावाचे अनुमोदन उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केवश प्रसाद मौर्या यांनी केले”

Pm narendra modi, race course,
पुणे : साडेचार दशकांनंतर रेसकोर्सवर पंतप्रधानांची सभा, भाजपतर्फे नियोजन सुरू, पोलिसांकडूनही स्थळाची पाहणी
Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

हेही वाचा – “वरूण गांधी आणि माझी विचारधारा वेगळी, माझा गळा चिरला तरीही मी RSS…” राहुल गांधी यांचं वक्तव्य

निर्मला सीतारामण यांचे विरोधकांवर टीकास्र

पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसह विरोधीपक्षांवरही टीकास्र सोडलं. विरोधकांनी विविध मुद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छवी बिघडवण्याचा प्रयत्न केला. पेगासस, राफेल, तपास यंत्रणांचा दुरुपयोग, नोटबंदी यासह विविध मुद्यांवरून विरोधकांनी भाजपाविरोधात नकारत्मक प्रचार केला. यामुद्द्यांवरून ते न्यायालयातदेखील गेले. मात्र, न्यायालयाने प्रत्येकवेळी विरोधकांना फटकारले. त्यांच्या विरोधात निकाल दिला, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या शासकीय समारंभांचा राजकीय वापर? विरोधकांचा आक्षेप

पंतप्रधान मोदींचे मानले आभार

दरम्यान, यावेळी पक्षाला गुजरात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच गुजरात निवडणुकीच्या निकालाचा फायदा भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही होईल, असा दावा त्यांनी केला. पुढे बोलताना, पंतप्रधान मोदींमुळे आज भारताचे नाव जगाच्या पातळीवर उंचावले आहे. त्यांनी देशातही काशी विश्वनाथ कॉरिडोर, महाकाल लोक, बुद्ध सर्कीट आणि राम मंदिराचे निर्माण करून देशाची संस्कृती जपण्याचे महान कार्य केल्याचz प्रतिक्रियाही त्यांनी दिली.