प्रबोध देशपांडे

अकोला : राज्यात वंचित बहुजन आघाडी व शिवसेना ठाकरे गटामध्ये आघाडी आहे, तसेच सत्तेत सहभागी होत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने भाजपसोबत हातमिळवणी केली. या राजकीय पक्षांमध्ये राज्यात मैत्री असली तरी जिल्ह्यात स्थानिक नेत्यांकडून मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्याचे नेहमीच प्रयत्न केले जातात. याचा प्रत्यय अकोला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा आला. शिवसेनेने वंचितला कोंडीत पकडले. या अगोदर राष्ट्रवादीने देखील भाजपवर टीका करून वाद ओढवून घेतला होता. राज्यात आघाडी करून वरिष्ठ नेते एकत्र आल्यानंतरही स्थानिक नेत्यांमध्ये मनोमिलन घडून आले नसल्याचे चित्र आहे.

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
arun gawli marathi news, arun gawli jail marathi news
विश्लेषण: अरुण गवळीची सुटका होणार का? न्यायालयाने काय म्हटले? राज्य सरकारची भूमिका काय?
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका

२०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल घडून आले. राज्यात मोठे राजकीय भूकंप होऊन शिवसेना व राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. शिवसेनेमध्ये सातत्याने पडझड होत असतांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंसाेबत मैत्रीचा हात मिळवला. ‘मविआ’ किंवा इंडिया आघाडीचा ‘वंचित’ घटक पक्ष नसला तरी त्यांची शिवसेना ठाकरे गटासोबत आघाडी आहे. दोन्ही नेत्यांकडून तसे जाहीर करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा वंचित आघाडीचा गड. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून अकोला जिल्हा परिषदेवर वंचितची सत्ता आहे. राज्यात वंचित व शिवसेना ठाकरे गटाची आघाडी असली तरी त्याचा परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर कुठेही दिसून येत नाही. जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वंचित आघाडी व शिवसेना ठाकरे गटाचा एकमेकांचे विरोधक म्हणूनच वावर आहे. अकोला जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या भूमिकेमुळे वंचितची सत्ता अबाधित राहिली, तर शिवसेना ठाकरे गट विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा… कळवा-मुंब्य्रात गणेशोत्सवात मंडळांची ‘दिवाळी’

जि.प.च्या सर्वसाधारण सभेत शिवसेना ठाकरे गटाने राज्यातील वंचित सोबतची आघाडी विसरत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी वंचितला अडचणीत आणले. हाता येथील जिल्हा परिषदेची शेतजमीन वहितीसाठी अत्यल्प दरात दिल्याचा मुद्दा शिवसेनेचे गटनेता गोपाल दातकर यांनी आक्रमकपणे उपस्थित केला. या प्रकरणावरून शिवसेना व वंचितच्या जि.प. सदस्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे सभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वंचित व शिवसेनेच्या राज्यातील मैत्रीला ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यातच सुरुंग लागला आहे.

हेही वाचा… पिंपरी- चिंचवडमध्ये पार्थ पवार यांना रोहित पवार यांचे आ‌व्हान ?

वंचित व शिवसेनेप्रमाणेच जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे देशील सुत जुळले नाही. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी थेट भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर भाजपने देखील आ.मिटकरींवर पलटवार केला होता. आ.मिटकरी सत्तेत सहभागी असतांनाही त्यांनी भाजप खासदारांवर टीका केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपचे विद्यमान खासदार असल्यावर सुद्धा अमोल मिटकरींनी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक वेळा अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी व भाजपमध्ये जुंपल्याचे चित्र दिसून येते. वंचित-शिवसेना व भाजप-राष्ट्रवादीत ज्या पद्धतीने टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप होतात त्यावरून स्थानिक नेते एकत्र येण्याची सुतराम शक्यता वाटत नाही. राज्यात आघाडी असली तरी जिल्ह्यात शह-काटशहाचे राजकारण रंगण्याचीच चिन्हे आहेत.

हेही वाचा… कांद्याच्या दरावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली

निवडणुकीत अवघड

राज्यात वरिष्ठ स्तरावर सोयीस्कर आघाड्या करण्यात आल्या. जिल्हास्तरावर मात्र त्या आघाड्यांचा सकारात्मक परिणाम दिसून आला नाही. त्यातच आगामी काळातील निवडणुकांमध्ये जागा वाटपावरून सत्ताधारी व विरोधी पक्षातील आघाड्यांमध्ये अंतर्गत ओढाताण होईल. वरिष्ठ स्तरावर आघाडी असली तरी जिल्ह्यात नेते एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे निवडणुकीत राजकीय पक्षांसह स्थानिक नेत्यांना आणखी अवघड जाणार आहे.