काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचा पहिला टप्पा पार पडला आहे. यानंतर राहुल गांधी आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. मंगळवारी ( ७ फेब्रुवारी ) राहुल गांधींनी संसदेत अदाणी प्रकरणावरून मोदी सरकारला घेरलं होतं. अशातच राहुल गांधी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ हे धार्मिक नेते नाहीतर एक ‘ठग’ आहेत, असं विधान राहुल गांधींनी केलं आहे.

राहुल गांधींनी दिल्लीत काही समाजिक संघटनांशी चर्चा केली. तेव्हा बोलताना राहुल गांधी म्हणाले, “कोणताही धर्म उत्तर प्रदेशमध्ये हिंसेला समर्थन करत नाही. पण, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या भाषेवरून धार्मिक नेते वाटत नाहीत. फक्त भगवे वस्त्र घातल्याने कोणी धार्मिक नेते होत नाही. योगी आदित्यनाथ धार्मिक नेते नाहीतर एक ‘ठग’ आहेत. भाजपा उत्तर प्रदेशमध्ये अधर्म पसरवण्याचं काम करत आहे.”

हेही वाचा : अतिक्रमणविरोधी कारवायांवरून ओमर अब्दुलांचं केंद्र सरकारवर टीकास्त्र; म्हणाले, “घरांवर बुलडोझर चालवणे…”

“योगी आदित्यनाथ आपल्या मठाचा अपमान करत आहेत. इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध धर्माबद्दल मी वाचलं आहे. हिंदू धर्माचीही मला माहिती आहे. परंतु, कोणताही धर्म द्वेष पसरवण्यास सांगत नाही,” असं राहुल गांधींनी सांगितलं.

हेही वाचा : “त्यांना राम आणि कृष्णाच्या अस्तित्वावर शंका”, कांग्रेस आणि डाव्यांवर बरसले योगी आदित्यनाथ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधींच्या विधानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “काँग्रेस नेहमीच लोकांच्या भावनांशी खेळत आली आहे. राममंदिर, रामसेतुला काँग्रेसने सतत विरोध केला. काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा रोज भ्रष्टाचाराची प्रकरण समोर यायचे. पण, आज विकासाची कामं मोठ्या प्रमाणात होतं आहेत. काँग्रेसचा इतिहास हा देशाला फसवायचा राहिला आहे,” अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.