अयोध्येत राममूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती तसेच राजकीय नेते उपस्थित होते. काँग्रेसने मात्र या सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. असे असले तरी काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह आणि निर्मल खत्री या दोन नेत्यांनी अयोध्येतील या सोहळ्याला हजेरी लावली. विक्रमादित्य हे सुखविंदर सिंह सुखू यांच्या हिमाचलप्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत. तर खत्री उत्तर प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच फैजाबादचे माजी खासदार आहेत. 

पुत्रधर्म म्हणून मी आमंत्रण स्वीकारले”

विक्रमादित्य हे हिमाचल प्रदेशचे ग्रामविकासमंत्री आहेत. त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच अयोध्येतील राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण स्वीकारले होते. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा राम जन्मभूमी आंदोलनात सहभाग होता. याच कारणामुळे पुत्रधर्म म्हणून मी हे आमंत्रण स्वीकारले आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी यामागे दिले आहे.

Umarkhed, Digras, Ralegaon, Sanjay Rathod,
उमरखेडमध्ये दोन माजी आमदारांचे नवख्यांना आव्हान; दिग्रस, राळेगावमध्ये आज-माजी मंत्र्यांची शक्ती पणाला
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
appasaheb jagdale
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या ! आप्पासाहेब जगदाळे यांनी दिला आमदार दत्तात्रय भरणेंना पाठिंबा
DGP rashmi shukla visited RSS headquarters at Nagpur, nana patole complaint to election commission of india
निवडणुकीपूर्वी बदली झालेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत? विरोधकांनी त्यांच्या बदलीची मागणी का केली होती?
Gopal Shetty Take back From Election
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची माघार, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी, बोरीवलीतलं बंड शमवण्यात भाजपाला यश
Ratan Tata Successful businessman with social consciousness
रतन टाटा : सामाजिक जाणीव राखणारा यशस्वी उद्योगपती
Gopal Krishna Gokhale, Haribhau Apte,
मतदारांना ‘किंमत’ देणारे लोकप्रतिनिधी
Sharad Pawar Baramati , Ajit Pawar Baramati ,
दिवाळीत बारामतीमध्ये फुटणार राजकीय फटाके, कारण दोन्ही पवार…!

हेही वाचा >>> राजधानी दिल्लीत झोपडपट्ट्यांवरून राजकारण, आप-भाजपा यांच्यात नेमका वाद काय?

सोहळ्याला हजर राहणे माझे नैतिक कर्तव्य”

“मी यापूर्वी केलेल्या माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी एक राजकारणी म्हणून अयोध्येतील राम मंदिराला भेट देत नाहीये. मी वीरभद्र सिंह यांचा पुत्र म्हणून या सोहळ्यात सहभागी होणार आहे. ते प्रभू रामाचे भक्त होते. त्यांचा पुत्र म्हणून या सोहळ्याला हजर राहणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे. मी पुत्रधर्म कसा नाकारू शकतो,” असे विक्रमादित्य म्हणाले.

पक्षाचा निर्णय फेटाळण्याची पहिलीच वेळ

विक्रमादित्य यांच्या या भूमिकेवर हिमाचल प्रदेश काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. “विक्रमादित्य आणि हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. पार्टीचा निर्णय फेटाळण्याची ही विक्रमादित्य यांची पहिलीच वेळ आहे,” असे काँग्रेसने म्हटले आहे. २२ जानेवारीनंतर काँग्रेस पक्षाचे नेते राम मंदिरात जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतील, असे विक्रमादित्य यांना सांगण्यात आले होते.

संघ, भाजपाच्या विचारांचा विरोध करतो”

विक्रमादित्य यांनी याआधी इंडियन एक्स्प्रेसला मोबाईल फोनवर प्रतिक्रिया दिली होती. “मी माझे मत माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलेले आहे. मला माझ्या वडिलांच्या आदरापोटी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळालेले आहे. माझे वडील राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी होते. तरीदेखील मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद तसेच भाजपाच्या विचारांच्या हिंदू राष्ट्राचा विरोध करतो. त्यांच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाचाही मी विरोध करतो. मी काँग्रेसचा एक खंदा कार्यकर्ता आहे. मी काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ आहे,” असे विक्रमादित्य यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पक्षात नवचेतना निर्माण करणयासाठी प्रदेशाध्यक्षांची धडपड, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला उभारी मिळणार का?

रामाची भक्ती करण्यात काहीही गैर नाही”

विक्रमादित्य यांच्याव्यतिरिक्त निर्मल खत्री यांनीदेखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली. मकर संक्रांतीनिमित्त उत्तर प्रदेश काँग्रेसच्या काही नेत्यांनी राम जन्मभूमी परिसरात जाऊन शरयू नदीत स्नान केले होते. तसेच हनुमानगढी आणि तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या मंदिराला भेट देऊन प्रभू रामाचे दर्शन घेतले होते. याच कारणामुळे मलादेखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याची प्रेरणा मिळाली, असे निर्मल खत्री म्हणाले होते. “रामाची भक्ती करण्यात काहीही गैर नाही. रामभक्तांपैकीच एक असल्याचा मला अभिमान आहे,” असे समाजमाध्यमावर पोस्टच्या माध्यमातून खत्री म्हणाले होते. खत्री हे २०१२ ते २०१६ सालापर्यंत उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. “काँग्रेसच्या सदस्यांनी या कार्यक्रमाला जायचे की नाही, याबाबत संघटनेकडून काहीही निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मी त्या सोहळ्यात सहभागी होणार आहे. मी त्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारलेले आहे,” असे खत्री यांनी सांगितले होते.

“विचारांची लढाई विचारानेच लढावी लागेल”

“हाडाचा काँग्रेस कार्यकर्ता म्हणून संघाच्या विचारधारेशी लढा द्यायचा असेल तर तो विचारांनीच द्यावा लागेल, असे मला वाटते. आपल्याला आपली विचाधारा आणखी बळकट करावी लागेल. तसेच स्थानिक पातळीवर संघटनेला बळ द्यावे लागेल. याच माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे,” असे मतही खत्री यांनी व्यक्त केले होते.