सिद्धेश्वर डुकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इतर पक्षाच्या तुलनेत मुंबईत ताकद कमी असली तरी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मनापासून मदत करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे गुजराथी चेहेरे यांच्या प्रचाराच्या सभा होणार आहेत. तसेच मुंबईतील राष्ट्रवादीचे सहा जिल्ह्याचे पदाधिकारी प्रचारात उतरणार आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकारी यांच्यासोबत समन्वय साधून प्रचार करणार आहेत.

हेही वाचा : मुरजी पटेल : काँग्रेस ते भाजप व्हाया शिवसेना ; अवैध जात प्रमाणपत्रामुळे नगरसेवकपदही गमावल्याचा इतिहास

भाजप आणि शिवसेना यांच्यात सरळ सामना आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला हरवण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. तसेच मुंबईतील सर्व जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांना आदेश देऊन कामाला लावले आहे.

हेही वाचा : धुळे मनपात सत्ताधारी भाजपची कोंडी ; समस्या सुटत नसल्याने स्वपक्षीयांचा वैताग

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव शिवसेना उमेदवारांसोबत होत्या. अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील उत्तर भारतीय, गुजराती, मुस्लीम,मराठी मतदारांपर्यत पोहचण्यासाठी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ,पदाधिकारी यांना नातेवाईक,मित्र परिवार यांच्या मार्फत संपर्क मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यास सांगण्यात आले आहे. मुस्लीम मते मिळवण्यासाठी मुस्लीम पदाधिकाऱ्यांवल जबाबदारी सोपवली आहे,. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rutuja latke andheri by election ncp leaders in field campaigning mumbai bjp shivsena ajit pawar jayant patil print politics news tmb 01
First published on: 14-10-2022 at 15:51 IST