सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केवळ चांगल्या खात्याचे मंत्रीपदच नाही, तर औरंगाबादचे पालकमंत्रीपद आपल्याकडे असावे यासाठी आमदार अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि संजय शिरसाठ यांच्यात रस्सीखेच सुरू असून मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर गाड्या भरून कार्यकर्ते नेण्याचा प्रकार पालकमंत्रीपदासाठीची रस्सीखेच असल्याचे मानले जात आहे. तर हीच राजकीय कृती शिवसेनेतील फूट किती रुंदावली आहे, हे सांगण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत आहे.औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील विविध विकास कामांना तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी दिलेला निधी, मतदारसंघात भेट देऊन केलेली उद्घाटने यामुळे आमदार संजय शिरसाट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे अशी त्यांची प्रतिमा. बंडाळीनंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून पत्र लिहित शिरसाठ यांनी शिवसेनेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदार गटाचे ते महत्त्वाचे नेते असल्याची प्रतिमा निर्माण करण्यातही त्यांना यश मिळाले. आता मंत्रीपद मिळावे आणि त्यात यश आले तर पालकमंत्री म्हणून नियुक्ती व्हावी म्हणून त्यांचे समर्थक मुंबई दरबारी शक्तीप्रदर्शनासाठी गेले असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तसा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat and abddul sattar both are interested for the post gradian minister of aurangabad pkd
First published on: 15-07-2022 at 11:24 IST