चंद्रशेखर बोबडे

नागपूर: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि वने व सांस्कृतिक आणि मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यंदा पक्षाने त्यांच्या इच्छेविरुद्ध चंद्रपूर येथून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मुनगंटीवार यंदा लोकसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू झाली तेव्हाच त्यांनी स्वत:च ‘मी माझेच तिकीट कापण्यासाठी प्रयत्नशील आहे’ असे जाहीरपणे सांगून आपण दिल्लीत जाण्यासाठी इच्छुक नाही, असे संकेत दिले होते.

narendra modi sonia gandhi pti
“मैदान सोडून पळून जाणारे आता…”, पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींना टोला
congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
Pankaja Munde, Pankaja Munde campaign rally,
पंकजा मुंडेंच्या प्रचार मेळाव्यात पक्षांतर्गत गटबाजीचे दर्शन, आमदार मुंदडा अनुपस्थित
narendra modi rahul gandhi lalu yadav
“मुघलांच्या मानसिकतेतून…”, राहुल गांधी – लालू यादवांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

पक्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या सुधीरभाऊंना पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून दिल्लीला पाठवण्याचा निर्णय झाल्याचा व त्यासाठी नागपुरातीलच काही नेते कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. २०१९ मध्ये चंद्रपूरमधून भाजपचे उमेदवार व तत्कालीन केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव झाला होता व येथून राज्यातील काँग्रेसचे ऐकमेव उमेदवार बाळू धानोरकर विजयी झाले होते. २०२४ मध्ये ही जागा जिंकायचीच तर सक्षम उमेदवार हवा म्हणून सुधीरभाऊंचे नाव पुढे करण्यात आल्याचे समजते.

सुरुवातीला लोकसभा नाही म्हणणाऱ्या सुधीरभाऊ यांनी त्यांच्या राजकीय जीवनात लढलेली पहिली निवडणूक लोकसभेचीच (१९८९) होती व त्यात ते पराभूत झाले होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी पराभव पाहिला नाही. सलग तीन वेळा चंद्रपूरमधून व नंतर हा मतदारसंघ राखीव झाल्याने बल्लारपूर-मूल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले. १९९५ पासून सलग तीस वर्षं ते राज्य विधानसभेचे सदस्य असून भाजपचा विदर्भातील प्रमुख चेहरा म्हणून त्यांची राजकारणात ओळख आहे. या काळात त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषवली. २०१४-१९ मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे अर्थ आणि नियोजन व वन अशी तीन प्रमुख खाती होती. १९९५ ते १९९९ युतीची सत्ता असताना ते पर्यटनमंत्री होते. २०२२ मध्ये आलेल्या शिंदे सरकारमध्ये त्यांच्याकडे वन आणि सांस्कृतिक व मत्सव्यवसाय अशी तीन प्रमुख खाती आहेत.

निष्ठावंत कार्यकर्ता : संघटनेत त्यांनी जिल्हापातळीपासून काम केले. २०१० ते २०१३ पर्यंत प्रदेशाध्यक्ष होते. संघाचा स्वयंसेवक, सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची शैली, अभ्यासू वृत्ती , उत्तम वक्तृत्व ही वैशिष्ट्ये आहेत.