सुहास सरदेशमुख
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत मराठवाड्यातील बहुसंख्य आमदार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. काही जुन्या-जाणत्यांना बरोबर घेऊन मोजक्याच आमदारांच्या सहाय्याने शरद पवारांना मराठवाड्यात पुन्हा एकदा पक्षाची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. त्यांना आता त्यांच्या तिसरी पिढीतील कार्यकर्त्यांना बरोबर घ्यावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ याचा संभ्रम निकाली निघाला असून शरद पवारांबरोबर केवळ दोन आमदार असल्याचे चित्र राजकीय पटलावर दिसून येत आहे.

मराठवाड्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, त्यांचे नेतृत्व करणारी मंडळी आता अजित पवारांबरोबर गेली आहेत. उदगीरचे संजय बनसोडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. मात्र, मंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे आणखी तिघेजण अजित पवारांबरोबर आहेत. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची लाल दिव्याची इच्छा सार्वजनिक कार्यक्रमातून दिसून आली आहे. कार्यकर्त्यांनीही तशा मागण्या पूर्वी केल्या होत्या. आष्टीचे आमदार बाळासाहेब आसबे हेही अजित पवार यांचे जाहीर समर्थन करत आहेत. हिंगोलीचे आमदार राजू नवघरे यांनी मात्र शरद पवार यांच्याबरोबर राहण्याची भूमिका घेतली असे जाहीरपणे सांगितले असले तरी पूर्णा कारखान्यातील निवडणुकीनंतर ते अजित पवार यांच्याही संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींची ताकद धाकल्या पवारांकडे तर काही जुन्या मित्रांसह शरद पवार यांना मराठवाड्यात पुनर्बांधणी करावी लागणार आहे.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार

हेही वाचा… तटकरे आणि गोगावले सूर जुळणे अशक्यच

नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांत राष्ट्रवादीची ताकद अलिकडच्या काळात कमी झाली होती. मात्र, मित्र कलमकिशोर कदम, अंकुश कदम, विधान परिषद सदस्य बाबाजानी, फौजिया खान ही मंडळी शरद पवारांबरोबरच आहेत. हिंगोलीमध्ये साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनीही आपण शरद पवार समर्थकच असे जाहीरपणे सांगितले आहे. संदीप क्षीरसागर आणि राजेश टोपे या दोन आमदारांसह मराठवाड्यातील बांधणी करताना शरद पवारांना आता तिसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्ते यांना संधी द्यावी लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या तीनही जिल्ह्यांत पुनर्बांधणीसाठी कार्यकर्त्यांची शोधाशोध करून नवीन संघटना उभारली जाऊ शकेल काय, याची चाचपणी केली जात आहे. ज्या जिल्ह्यात शरद पवारांची ताकद अधिक मानली जात होती, त्या धाराशिव जिल्ह्यात आता त्यांना संजय पाटील दुधगावकर, संजय निंबाळकर, जीवनराव गोरे यांच्यासह कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे लागणार आहे. यातील जीवनराव गोरे वगळता अन्य कार्यकर्ते नवीन आहेत. अलिकडेच भूम-परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे यांनीही आपण थोरल्या पवारांबरोबरच असे जाहीर केले आहे. बाणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार यांनी राहुल मोटे यांना मदत केली होती. मात्र, या मतदारसंघात शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्याविरुद्ध निवडणूक लढवायची असल्याने राजकीय अपरिहार्यता म्हणून मोटे यांनी शरद पवार यांच्या बाजूने थांबण्याचा निर्णय घेतला. तालुकानिहाय आणि साखर कारखान्याच्या प्रभाव क्षेत्रात अजित पवार यांचे समर्थक कार्यकर्ते अधिक असल्यामुळे शरद पवार यांना पुनर्बांधणीसाठी अधिक जोर लावावा लागणार आहे. शहरी भागातील वातावरणापेक्षाही शेतकऱ्यांचा पाठिंबा शरद पवार यांना अधिक असतो, असे यापूर्वी दिसून आले होते.

हेही वाचा… चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाच्या मागणीला पुन्हा जोर

४५ वर्षानंतर पुन्हा योगायोग

१९७८ मध्ये शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या विरोधात तेव्हा बंड केले होते तेव्हा त्यांच्यासमवेत ३६ आमदारांचा पाठिंबा होता. आता त्यापेक्षाही जास्त आमदार अजित पवार यांच्या बाजूने आहेत, असे आवर्जून सांगितले जात आहे. पण फूट टिकवून ठेवण्यासाठी धाकल्या पवारांना ३६ आमदारांचीच गरज आहे. त्यावेळी शरद पवार यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून सुंदरराव सोळंके यांनी शपथ घेतली होती. आता सोळंके यांचे पुत्र प्रकाश सोळंके अजित पवार यांच्या बाजूने उभे ठाकले आहेत.