दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिल्याने शिवसेनेने बंडानंतर शिंदे गटाच्या विरोधातील पहिली कायदेशीर लढाई जिंकली आहे. न्यायालयाने दिलेल्या परवानगीमुळे शिवसेना आणि शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हे समीकरण कायम राहिले आहे.

हेही वाचा >>> भाजपचे मिशन मराठवाडा – रखडलेल्या प्रकल्पांना वेग देण्याची भाजपची योजना

Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का
Supreme Court grants bail to YouTube vlogger arrested on charges of insulting Tamil Nadu Chief Minister MK Stalin
निवडणुकीआधी किती जणांना तुरुंगात टाकणार? सर्वोच्च न्यायालयाकडून ‘यूटय़ूब व्लॉगर’ला जामीन देताना विचारणा
Supreme Court Grants Conditional Bail to former professor Shoma Sen in Bhima Koregaon Case
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन, या अटी घातल्या…
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

शिवसेनेच्या स्थापनेनंतर लगेचच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परंपरा पडली. ‘विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवतीर्थावर चला, अशी शिवसेनेची तेव्हा घोषणा असायची. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुमारे तासभराच्या भाषणात शिवसैनिकांना आगामी वाटचालीची दिशा द्यायचे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील बाळासाहेबांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळातील साऱ्यांचेच लक्ष असायचे. कारण ठाकरे कोणाची टोपी उडवतील वा कोणाला टीकेचे लक्ष्य करतील याची उत्सुकता असायची. बाळासाहेबांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे शिवसैनिकांना पर्वणीच असायची.

हेही वाचा >>> सचिन पायलट यांची इच्छा पूर्ण होणार का ?

सुमारे ५० वर्षांच्या शिवसेनेच्या कार्यकाळात तीन-चार वेळाच दसरा मेळाव्यात खंड पडला. पावसाने मैदानात चिखल झाल्याने २००६ मध्ये मेळावा रद्द करावा लागला होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातही २०१४ व २०१९ मध्ये दसरा मेळावा झाला नव्हता. दसरा मेळावा हा नेहमी सायंकाळी होतो. सुरक्षेच्या कारणावरून मागे एकदा दसरा मेळावा सकाळी घेण्यात आला होता.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंची अवस्था ‘ माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ एवढीच राहिल ; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी खोचक टीका

बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीही दसरा मेळाव्यात तेवढाच जोष आणि गर्दी होत असते. यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खरी शिवसेना कोणाची हा कायदेशीर वाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी सुरू होईल. यातूनच उद्धव ठाकरे यांना शक्तिप्रदर्शनाची ही संधी आहे. शिवसेना संपलेली नाही हे ठाकरे यांना दाखवून द्यायचे आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खोडा घालून शिवसेनेची खिजविण्याची शिंदे गटाची योजना होती. पण शिवार्जी पार्कवर ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. शिंदे गटाला बेकीसी मैदानात मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळाली आहे.शिवसेनेचा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा बीकेसी मैदानात एकाच वेळी मेळावा झाल्यास शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मेळाव्यात जास्त गर्दी कोणाकडे होते याची स्पर्धा असेल.