मुंबई : मराठा आरक्षण रद्दबातल करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती करणाऱ्या राज्य सरकारच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर गेली असून ती आता २४ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे ही याचिका न्यायालयाने स्वीकारली असल्याचे दावे करण्यात येत असले तरी या याचिकेवरील सुनावणी केवळ पुढे ढकलण्यात आली आहे, असे ज्येष्ठ वकिलांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठापुढे न्यायमूर्तींच्या दालनात सहा डिसेंबरला या याचिकेवर सुनावणी ठेवण्यात आली होती. तेव्हा कागदपत्रे पाहून ही सुनावणी २४ जानेवारीला ठेवण्याचे आदेश पीठाने दिले. या याचिकेवर पीठाने सखोल विचार अद्याप केलेला नाही. त्यामुळे याचिका स्वीकारलेली नाही, खुल्या न्यायालयात सुनावणीचे आदेश दिलेले नाहीत किंवा याचिका फेटाळलेली नाही. केवळ सुनावणी पुढे ढकलली असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

India abortion law
गर्भधारणेनंतर ३० आठवड्यांपर्यंत गर्भपातास परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; भारतीय गर्भपात कायदा काय आहे?
Supreme Court verdict on minor abortion
तिसाव्या आठवडयात गर्भपातास परवानगी; अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
The nine judge bench of the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?
supreme court
नुकसानभरपाईच्या पुनरावलोकनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; हवाई दल अधिकाऱ्याला एचआयव्ही संसर्ग

हेही वाचा : छत्तीसगडमध्ये भाजपाचा मोठा निर्णय, पहिल्यांदाच आमदार झालेल्या नेत्याची थेट प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती!

न्यायमूर्ती कौल हे २५ डिसेंबरला सेवा निवृत्त होत असून सर्वोच्च न्यायालयास नाताळची सुटी लागली आहे. रविवार व सोमवारी सुटी असल्याने सुनावणी २४ जानेवारीला होणार असल्याचे आदेश न्यायालयाने शनिवारी जारी केले. न्यायमूर्ती कौल सेवा निवृत्त होत असल्याने आता पीठामध्ये नवीन न्यायमूर्तींचा समावेश होईल आणि पुन्हा सरन्यायाधीशांच्या दालनामध्येच ही सुनावणी होईल, असे सूत्रांनी सांगितले. क्युरेटिव्ह याचिकेवरील सुनावणी लांबणीवर गेल्याने राज्य सरकारची पंचाईत झाली आहे.

हेही वाचा : सिलक्यारा बोगदा : ५० हजारांच्या मदतीनंतर रॅट होल मायनर्स नाराज; काँग्रेसची भाजपावर टीका!

मराठा आरक्षणासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हा आशेचा किरण असल्याची भावना व्यक्त केली आहे. न्यायालयाने याचिका फेटाळली नसून २४ तारखेला सुनावणी ठेवली आहे, याचा अर्थ याचिका स्वीकार ली, असा वाटत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या दृष्टीने हा दिलासा असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

हेही वाचा : नितीश कुमार जदयू पक्षाचे नवे अध्यक्ष? लवकरच निर्णय होण्याची शक्यता

महायुती सरकारचा मोठा विजय- चंद्रशेखर बावनकुळे

मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह याचिका न्यायालयाने स्वीकारल्याने हा महायुती सरकारचा मोठा विजय असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महायुती सरकारने न्यायालयात भक्कमपणे कायदेशीर बाजू मांडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झालेले मराठा आरक्षण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्य सरकार न्यायालयात कायदेशीर मुद्दे मांडून आरक्षण पुन्हा मिळून देईल व मराठा समाजाला न्याय देईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.