काही महिन्यांपासून देश पातळीवर ओबीसी समाज राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम, छत्तीसगड या पाच राज्यांच्या निवडणुकांत ओबीसी समाजाला आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने देण्यात आली. काँग्रेसने तर जवळजवळ या पाचही राज्यांत सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना करण्यात येईल, असे सांगितले. लोकसभा आणि राज्यसभेत महिलांना जारी करण्यात आलेल्या आरक्षणात ओबीसी महिलांनाही वेगळे आरक्षण द्यावे, अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी चेन्नईतील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. व्ही. पी. सिंह यांच्या कार्यकाळातच मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली होती.

व्ही. पी. सिंह यांचे कुटुंबीय उपस्थित

स्टॅलिन यांनी या वर्षातील २० एप्रिल रोजी व्ही. पी. सिंह यांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता पुतळ्याच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी व्ही. पी. सिंह यांच्या कुटुंबीयांनादेखील आमंत्रित करण्यात आले होते. अनेक दिवसांपासून जातीआधारित जनगणना करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. असे असतानाच व्ही. पी. सिंह यांचा पुतळा उभारून स्टॅलिन ओबीसीकेंद्रित राजकारणाला आणखी हवा दिल्याचे म्हटले जात आहे.

bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Prithviraj Chavan on delhi Government
Prithviraj Chavan : “दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकतील”, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ; स्पष्टीकरण देत म्हणाले…
Former Chief Minister Prithviraj Chavan regrets the misinformation spread about Dr Manmohan Singh
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत अपप्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खंत
bjp Freebies route to delhi assembly power
दिल्ली निवडणुकीत भाजपची अर्थसंकल्पीय रेवडी?

कार्यक्रमाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा

या कार्यक्रमात बोलताना स्टॅलिन यांनी, सामाजिक न्यायासाठी आरक्षणासारख्या उपाययोजना आवश्यक आहेत, असे सांगितले. या कार्यक्रमात अखिलेश यादव हेदेखील उपस्थित होते. या उपस्थितीमुळे व्ही. पी. सिंह यांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली.

कार्यक्रमाला अखिलेश यादव उपस्थित

आपल्या भाषणात बोलताना स्टॅलिन यांनी व्ही. पी. सिंह यांनी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करीत त्यांच्या कामाचा गौरव केला. “व्ही. पी. सिंह यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. अखिलेश यादव हेदेखील त्याच राज्याचे आहेत. अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशचे भविष्यातील मुख्यमंत्री आहेत. अखिलेश यादव आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. ते मुलायम सिंह यांचे सुपुत्र आहेत. व्ही. पी. सिंह यांचे आवडते नेते राममनोहर लोहिया यांच्या तालमीत अखिलेश यादव तयार झालेले आहेत. व्ही. पी. सिंह आणि तमिळनाडूचे खास नाते आहे,” असे स्टॅलिन म्हणाले.

व्ही. पी. सिंह यांच्या कुटुंबीयांचे मानले आभार

“व्ही. पी. सिंह यांच्या पत्नी सीता कुमारी, तसेच त्यांचे पुत्र अजय सिंह, अभय सिंह यांनी आमचे निमंत्रण स्वीकारले. त्यामुळे मी त्यांचे आभारच मानतो. अजय सिंह, अभय सिंह फक्त हेच व्ही. पी. सिंह यांचे कुटुंब नाही. आपण सर्व जण त्यांचे कुटुंबीय आहोत,” असेही स्टॅलिन म्हणाले.

व्ही. पी. सिंह यांच्या कार्यकाळात मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी

सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचाही स्टॅलिन यांनी उल्लेख केला. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील लोकांना २७ टक्के आरक्षणाचा हक्का प्राप्त झाला होता. स्टॅलिन यांचे वडील एम. करुणानिधी यांनीदेखील या निर्णयाला पाठिंबा दिला होता. करुणानिधी यांच्या सामाजिक न्यायाप्रति असलेल्या दायित्वाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.

१९८८ साली व्ही. पी. सिंह यांच्याशी पहिली भेट

यावेळी बोलताना स्टॅलिन यांनी त्यांचे व्ही. पी. सिंह यांच्यासोबत असलेल्या संबंधांवर भाष्य केले. माझी आणि सिंह यांची पहिली भेट १९८८ साली झाली होती. त्यानंतर अनेक वेळा आम्ही भेटलो, असे स्टॅलिन म्हणाले.

“मागास प्रवर्गाचे पुरेसे प्रतिनिधित्व नाही”

या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टॅलिन यांनी भारताच्या राजकारणावरही भाष्य केले. शासनाच्या वेगवेगळ्या विभागात मागास प्रवर्गाचे समाधानकारक प्रतिनिधित्व नाही. या स्थितीमध्ये सध्या बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे यावेळी स्टॅलिन म्हणाले.

Story img Loader