तेलंगणामध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी भाजपाने जोरात सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. तेलंगणामध्ये भाजपाची सत्ता आली तर अल्पसंख्याक कोटा रद्द केला जाईल असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. निवडणुकीचे रणशिंग फुंकणाऱ्या अमित शाह यांच्या विधानावर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. याविषयावर केसीआर यांनी मौन का बाळगले आहे? असा प्रश्न तेलंगणातील काँग्रेस नेते उपस्थित करत आहेत.

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी इतर सर्व मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. मात्र या विषयावर काहीही बोलले नाहीत. राज्यातील १४ % लोकसंख्या असलेल्या लोकांशी संबंधित असणाऱ्या विषयावर ते गप्प का आहेत? ते अमित शाह यांना उत्तर द्यायला घाबरतात का? त्यांचं हे मौन म्हणजे अमित शाह यांच्या भूमिकेला मूक समर्थन समजायचे का? असे प्रश्न माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्षनेते मोहम्मद अली शब्बीर यांनी विचारले आहेत. 

lok sabha election 2024 dcm devendra fadnavis slams uddhav thackeray in daryapur rally
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट! उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांची टीका
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
tejashwi yadav on modi guarantee
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी…”, तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला
Sunita Kejriwal is likely to become Delhi Chief Minister
सुनीता केजरीवाल यांच्याक़डे मुख्यमंत्रीपद येण्याची शक्यता

अमित शहा नक्की काय म्हणाले? 

तेलंगणाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांच्या प्रजा संग्राम यात्रेच्या समारोपासाठी अमित शाह हैदराबाद येथे आले होते. तिथे एका जाहीर सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, ” भाजपा धर्मावर आधारित आरक्षणाच्या विरोधात आहे. तेलंगणात पुढे भजपाचे सरकार आले तर आम्ही धर्मावर आधारित असलेला मुस्लिम कोटा रद्द करू. या कोट्यामुळे इतर गरजू लोक आरक्षणापासून वंचित राहत आहेत. भाजपा सरकार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना लाभ देईल.” 

तेलंगणामध्ये असलेले आरक्षण 

सध्या तेलंगणामध्ये एकूण ५० टक्के आरक्षणातील ५० टक्के आरक्षण हे मागासवर्गीयांसाठी आहे. अनुसूचित जातींसाठी १५%, अनुसूचित जमातींसाठी ६% आणि ४% टक्के आरक्षण हे मुस्लिम समाजासाठी आहे. शब्बीर म्हणाले की चंद्रशेखर राव यांनी २०१४ च्या निवडणुकीत चार महिन्यात मुस्लिमांना नोकरीत आणि शिक्षणात १२% आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. सरकारला आता आठ वर्षे झाली, तरी अजूनही त्यांनी ते आश्वासन पूर्ण केलेले नाही.

टीआरएस आणि एमआयएम हे तेलंगणात मित्रपक्ष आहेत. पण आश्चर्यकारकरित्या एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर केसीआर यांनी बाळगलेल्या मौनावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मुस्लिम आरक्षण संपवण्याच्या कटात एमआयएमसुद्धा सहभागी असल्याचा आरोप शब्बीर यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष बीजेपी आणि एमआयएमचा मुस्लिम कोटा रद्द करण्याचा मनसुबा पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.