scorecardresearch

मिशन गोवा: कॉंग्रेस आणि तृणमुल कॉंग्रेस गोव्यात सक्रिय

जवळपास दोन महिन्यांपूर्वी आपल्या विधिमंडळ पक्षाचे विभाजन टाळल्यानंतर, काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ आमदारांच्या दिल्ली वारीला वेग असल्याचं दिसून येत आहे.

मिशन गोवा: कॉंग्रेस आणि तृणमुल कॉंग्रेस गोव्यात सक्रिय

गोव्यातील काँग्रेस आणि तृणमूल पक्षात सर्वच काही अलबेल असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जवळपास दोन महिन्यांपूर्वी आपल्या विधिमंडळ पक्षाचे विभाजन टाळल्यानंतर, काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ आमदारांच्या दिल्ली वारीला वेग असल्याचं दिसून येत आहे.दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने बुधवारी नवीन राज्य समिती स्थापन केली परंतु टीएमसीच्या गोव्यातील सर्वात विश्वासू चेहरा माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो यांना वगळले.

गोव्यातील राजकीय वर्तुळात काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत आणि मायकेल लोबो यांनी काँग्रेस सोडल्याबद्दल चर्चा रंगल्या होत्या. जुलैमध्ये, काँग्रेसने पक्षाच्या ११ पैकी आठ आमदारांना पुकारलेल्या बंडाला काँग्रेसने खोडून काढले होते. कामत आणि लोबो यांच्या दिल्ली भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कामत यांनी या आरोपांवर मौन सोडले आहे. राष्ट्रीय राजधानीतून परतल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर बोलताना त्यांनी या आरोपांचा खंडन केले. “प्रत्येक वेळी मी दिल्ली, मुंबई नागपूरला गेलो की प्रसारमाध्यमांकडून नेहमी असे प्रश्न विचारण्यात येतात.माझा प्रवास आणि खर्च मी स्वतः उचलतो. प्रत्येक वेळी मी कुठे जातो हे मी यांना का सांगावे .काँग्रेसमध्ये राहण्याचा तुमचा विचार आहे का ? असे विचारले असता कामत म्हणाले, “मी पुन्हा सांगतो आहे की सध्या मी निवृत्त झालो आहे. मी बरा झाल्यावर सक्रिय राजकारणात परतेन. मी माझ्या नेत्यांनाही याबद्दल कळवले आहे.”

लोबो यांनीही काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या आणि भाजप नेत्यांसोबत दिल्लीतील कथित भेटींच्या अफवाही खोडून काढल्या. गोवा विधानसभा आणि पंचायत निवडणुका पार पडल्याने आता दीड वर्षांहून अधिक अंतरावर असलेल्या लोकसभा निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोव्याच्या राजकीय परिदृश्यात, निरीक्षकांचे लक्ष कामत आणि लोबो यांच्यावर असेल जे राज्याच्या दोन लोकसभा जागांसाठीच्या लढतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या टीएमसीने ३८ सदस्यीय राज्य समितीची घोषणा केली. गोव्याचे प्रभारी तृणमूल नेते कीर्ती आझाद म्हणाले की, पक्षाच्या घटनेनुसार दोन संयुक्त निमंत्रकांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि राज्य युनिटच्या अध्यक्षाची आवश्यकता नाही.पक्षाचे राज्यसभेचे खासदार लुइझिन्हो फालेरो, गेल्या ऑक्टोबरमध्ये राजीनामा देणारे आणि टीएमसीमध्ये सामील होणारे गोव्यातील पहिले काँग्रेस आमदार यांना यादीतून वगळण्यात का आले असे विचारले असता आझाद म्हणाले, “मी फक्त यादीत असलेल्या लोकांसाठीच बोलू शकतो. 

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर टीएमसी पक्षातून बाहेर पडण्याची मालिका सुरू आहे, माजी प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकर यांनीही पक्ष सोडला आहे. आझाद म्हणाले की येत्या काही महिन्यांत टीएमसी गोवावासियांशी संबंधित मुद्दे उपस्थित करेल. “जर संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र आले, तर भाजपला (२०२४ मध्ये) सरकार स्थापन करणे खूप कठीण जाईल

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tmc and congress got active by keeping eye on upcoming election pkd

ताज्या बातम्या