त्रिपुरा विधानसभा निवडणुकीला आता केवळ काहीच दिवस बाकी आहे. निवडणुकीच्या आधी केंत्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या विजयाचा दावा केला आहे. शाह म्हणाले की, भाजपाच्या नेतृत्वातलं सरकार पुढची पाच वर्ष त्रिपुरावासियांना आणि राज्याला समृद्ध बनवेल. अमित शाह यांना निवडणुकीतल्या संभाव्य त्रिशंकू परिस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, त्रिपुरामध्ये निवडणूक क्षेत्र लहान आहे. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या आत भारतीय जनता पार्टी बहुमताचा आकडा पार करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमित शाह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान ते म्हणाले की, मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ‘चलो पलटाई’ (चला सत्तापालट करुया) असा नारा दिला होता. हा नारा केवळ सत्तेत येण्यासाठी नव्हता तर त्रिपुरातली परिस्थिती बदलण्यासाठी होता.

अमित शाह यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या युतीवर टीका केली आहे. शाह म्हणाले की, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने हातमिळवणी केल्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, हे पक्ष भाजपाला पराभूत करण्याच्या स्थितीत नाहीत. दोन्ही पक्षांना एक गोष्ट कळून चुकली आहे की, हे पक्ष एकट्याने भाजपचा सामना करू शकत नाहीत, भाजपाला पराभूत करू शकत नाहीत. परंतु यामुळे पक्षांचे उमेदवार आणि मतदारसंघ विभागले जातील.

हे ही वाचा >> Tripura Election: भाजपासाठी त्रिपुरा निवडणूक सोपी नाही; प्रद्योत देववर्मा ठरतायत मोठे आव्हान

राजस्थान, कर्नाटकमधली निवडणूक जिंकू

शाह म्हणाले की, आम्ही मणिपूर, आसाम, आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन केलं आहे. आता त्रिपुरा विधानसभा निवडणूक देखील सहज जिंकू. तसेच आगामी काळात भाजपा राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये देखील विजय मिळवेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tripura election 2023 amit shah says bjp will cross majority mark before 12 pm asc
First published on: 14-02-2023 at 17:11 IST