राम भाकरे

नागपूर: महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या वंदना भगत दलित-बहुजन चळवळीतून राजकारणात आलेले नवीन नेतृत्व आहे. गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारापासून प्रेरणा घेत महाविद्यालयीन जीवनापासूनच वंदना भगत यांचा सामाजिक चळवळीशी संबंध आला. घरची आर्थिक स्थिती बेताचीच. त्यात वडील सेवानिवृत्त झाल्याने घरची जबाबदारी अंगावर आली. त्यासाठी अर्थार्जन करण्यासाठी विविध ठिकाणी खासगी नोकरी करणे आलेच. ते करताना शिक्षणही त्यांनी सुरू ठेवले. एम.ए.पर्यंत शिक्षण घेतल्यावर माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी स्थापन केलेल्या व महिलांच्या प्रश्नावर लढणाऱ्या ‘निर्धार’ संघटनेच्या संपर्कात त्या आल्या. या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम सुरू असतानाच कुंभारे यांनीच स्थापन केलेल्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचात प्रवेश केला. येथून त्यांच्या राजकारणातील प्रवास सुरू झाला. कुंभारे यांनी भगत यांच्याकडे पक्षाच्या महिला आघाडी प्रमुखपदाची जबाबदारी दिली. महिलांच्या प्रश्नावर संघर्ष करण्याची तयारी, सर्वसामान्यांना भेडसावणारे मुद्दे घेऊन केलेली आंदोलने त्यातून २००७ मध्ये बहुजन रिपब्लिकन पक्षाने त्यांना नागपूरमध्ये महापालिका निवडणूक लढण्याची संधी दिली.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

हेही वाचा >>>तमणगोंडा रवि पाटील : ग्रामीण विकासासाठी वचनबद्ध

पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी, त्यांनी घेतलेल्या मतांमुळे प्रस्थापित राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतले. २०१२ च्या महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांना विजय मिळाला नाही. मात्र खचून न जाता प्रभागातील लोकांशी संपर्क कायम ठेवला. २०१७ मध्ये भाजप-बहुजन रिपब्लिकन एकता मंच यांची युती झाली. या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर त्या प्रथम महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या. नगरसेवक म्हणून त्यांची पाच वर्षांची कारकीर्दही लक्षवेधी ठरली. महापालिकेत विविध पदांवर काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. धंतोली विभाग सभापती म्हणूनही त्यांनी काम सांभाळले. राजकारणात ठरवून आले नसले तरी लोकांच्या समस्या सोडवण्याचे एक माध्यम असल्याने त्यात रमले. पण नगरसेवक झाले तरी समाधानी नाही. समाजासाठी खूप काही करायची इच्छा आहे. सामाजिक बांधिलकी असणाऱ्या सुशिक्षित तरुण-तरुणींनी राजकारणात प्रवेश केला तर हे क्षेत्र बदलू शकते. लोकांची कामेही मार्गी लागू शकतात’ असे वंदना भगत सांगतात. त्यांनी काही काळ पत्रकार म्हणूनही काम केले. यामुळे त्यांना सामान्य लोकांचे प्रश्न, महिलांच्या समस्यांची जाण आहे. एक लढाऊ महिला कार्यकर्ता म्हणूनही त्या ओळखल्या जातात.