राहाता : उर्जितावस्थेच्या प्रतीक्षेत असलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. आजी-माजी महसूलमंत्र्यांसह राष्ट्रवादी व भाजपच्या आजी-माजी आमदारांच्या भूमिकेमुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. याच काखान्यावरील वर्चस्वासाठी एकेकाळी माजी खासदार (स्व.) बाळासाहेब विखे व माजीमंत्री (स्व.) शंकरराव कोल्हे यांच्यातील संघर्ष अनुभवला. अहमदनगर जिल्ह्याला विखे-थोरात यांच्यातील राजकीय वैमनस्य नवीन नाही, मात्र गणेश कारखान्याच्या निमित्ताने महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रथमच आमने-सामने येत आहेत. शिवाय राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे व त्यांचे परंपरागत विरोधक स्व. कोल्हे यांचे नातू तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. यातील तिघा विद्यमान आमदारांच्या शिर्डी, संगमनेर, कोपरगाव मतदारसंघातील गावे ‘गणेश’च्या कार्यक्षेत्रात असल्यानेच कारखान्याची निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.

दिवंगत खासदार बाळासाहेब विखे यांची ‘गणेश’वर सत्ता असताना १९८८ मध्ये कारखाना बंद पडला. त्यानंतर सभासदांनी सत्तांतर घडवत माजी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या गटाची सत्ता आणली. त्यावेळी आजारी कारखाना ‘कोल्हे पॅटर्न’ने ऊर्जेतावस्थेत आला. १५ वर्षे कोल्हे गटाने कारखान्यावर वर्चस्व ठेवले. नंतरच्या काळात कोल्हे व ‘गणेश’च्या संचालक मंडळातील अंतर वाढू लागले आणि कारखाना पुन्हा अडचणीत आला. त्यातून तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे यांचा संचालकांनी आधार घेतला. काही दिवस कारखाना चांगला चालला. परंतु पुन्हा बंद पडला. सन २०१२-१३ मध्ये ‘गणेश’ कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर असतानाच मंत्री विखे यांनी त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखालील पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने ‘गणेश’ चालवण्यास घेतला. आठ वर्षांचा करार झाला. गणेश कायमस्वरूपी सुरू राहावा यासाठी त्यांचे विखे-पुत्रांचे प्रयत्न सुरू आहेत. कारण कारखाना बंद राहिल्यास त्याचा फटका त्यांना मतदारसंघात बसू शकतो.

Chandrakant Patil, shivsena candidate,
मागील विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील शिवसेनेचे उमेदवार पाडण्यात चंद्रकांत पाटलांचा हात; भाजपच्या माजी नगरसेवकाचा गौप्यस्फोट
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
cm eknath shinde yavatmal lok sabha marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात..”; अखेर राजश्री पाटील यांचाच उमदेवारी अर्ज दाखल
kolhapur lok sabha marathi news, kolhapur sanjay mandlik latest news in marath
काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश

हेही वाचा – कर्नाटकच्या पराभवानंतर मध्य प्रदेश भाजपामध्ये चिंतेचे वातावरण; अंतर्गत मतभेद मिटवण्याचे आव्हान कायम

‘गणेश’ चालवण्यासाठी मंत्री विखे यांनी कारखान्यात मोठी आर्थिक गुंतवणूक केली. गाळप क्षमता वाढवली. परंतु कार्यक्षेत्रात कारखान्याला स्वतःचा पुरेसा ऊस नाही. त्यात आजूबाजूच्या कारखान्याला ऊस देण्याची राजकीय स्पर्धा असल्यामुळे कारखान्याला बाहेरून ऊस आणून आपला हंगाम पूर्ण करावा लागतो. त्यामुळे नफा-तोट्याचे गणित अनेक वर्षांपासून सुरू आहे. एक गट सत्तेत असला की दुसरा गट कारखान्याला ऊस पुरवत नाही. शिवाय आजूबाजूचे याच नेत्यांचे कारखाने ‘गणेश’चा ऊस पळवतात. परिणामी ऊस उत्पादकांची व कामगारांची देणी थकतात. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात किमान तीन लाख टन ऊसाचे उत्पादन आवश्यक आहे. परंतु बाहेरून एक ते दीड लाख टन ऊस उपलब्ध झाला तरच कारखाना गाळात करू शकतो आणि ऊर्जेतावस्थेत येऊ शकतो.

विखे यांच्या शिर्डी मतदारसंघात थोरात यांच्या संगमनेरमधील काही गावे आहेत. गेल्या विधानसभेला थोरात यांनी शिर्डीत विखे यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार दिला. त्यानंतर मंत्री झाल्यानंतर विखे यांनी संगमनेरमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी शिर्डी परिसरातील विविध सहकाराच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यास सुरुवात केली. त्यातूनच ‘गणेश’च्या निवडणुकीत ‘मविआ’च्या झेंड्याखाली थोरात यांनी पॅनलची तयारी सुरू केली आहे. यंदा प्रथमच ‘गणेश’च्या निवडणुकीत विखे-थोरात आमने सामने उभे ठाकणार आहेत.

माजी सहकार मंत्री कोल्हे यांनी ‘गणेश’च्या परिसरात निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फळी नंतर नेतृत्वहीन झाली व त्यातील बहुतांश कार्यकर्ते विखे गटाकडे आले. आता स्व. कोल्हे यांचे नातू, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ‘गणेश’च्या निवडणुकीत सक्रिय झाले आहेत. कोल्हे व विखे हे दोघेही भाजपचेच. ‘शिर्डी’तील ११ गावे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यावर विखे यांची पकड आहे. कोपरगाव मतदारसंघाचा सध्या राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे प्रतिनिधित्व करतात. या तिढ्याचे परिणाम ‘गणेश’च्या निवडणुकीतून दिसतात. त्यातूनच काळे-कोल्हे यांच्या भूमिकांकडे जिल्ह्याचे लक्ष राहील.

हेही वाचा – नवीन पटनाईक सोमवारी मंत्रिमंडळात फेरबदल करणार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

आ. काळे अद्याप गणेशच्या निवडणुकीत सक्रिय झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे आ. थोरात यांच्या ‘मविआ’च्या जुळवाजुळवीस किती सहकार्य मिळणार याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. काळे व कोल्हे या दोघांसाठी ‘गणेश’पेक्षा कोपरगाव विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा ठरतो. ‘गणेश’च्या कार्यक्षेत्रात तीन विधानसभा मतदारसंघातील गावे समाविष्ट असल्याने कारखान्याची निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

कोणतीही संस्था बंद पाडण्यासाठी आम्ही ताब्यात घेत नाही. ती चांगली चालली पाहिजे. गणेश कारखाना चालविण्यासाठी, कामगारांच्या कुटुंबासाठी, शेतकर्‍यांच्या कुटुंबासाठी मंत्री विखे यांनी मोठी रक्कम ‘गणेश’मध्ये गुंतविली असल्याने त्यांनी कुणाच्याही चेहेर्‍यावर दु:ख ठेवले नाही. आम्हाला पैशाचा मोह नाही. आमचा प्रपंच उद्ध्वस्त झाला तरी चालेल, पण आमच्या कार्यकर्त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त होऊ देणार नाही. सहकारी कारखाना चालविताना राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण सर्व निर्णय प्रक्रिया केल्या. निवडणुकीत बाहेरचे येतील आणि निघून जातील. पण कारखाना हितासाठी निवडणुकीत सर्वांचे सहकार्य मिळेल. – खा. डॉ. सुजय विखे.

गणेश कारखाना हा दहा-बारा वर्षांपूर्वी चांगल्या पद्धतीने कार्यरत होता. परंतु मागील दहा वर्षांत तेथे अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे आपण सर्वजण पाहतो आहे. त्या परिसरातील अनेक शेतकरी ‘संगमनेर’ कारखान्याला ऊस देण्यासाठी आग्रही असतात. शेतकऱ्यांच्या मागणीवरून संगमनेर कारखाना तो ऊस आणून गाळप करतो. गणेश कारखाना पुन्हा चांगल्या पद्धतीने चालावा, शेतकरी, ऊस उत्पादक व कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि तेथील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठीच आमचा प्रयत्न आहे. – आ. बाळासाहेब थोरात, माजी महसूल मंत्री.