छत्रपती संभाजीनगर : धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातील लिंगायत मतांवर प्रभाव असणाऱ्या बसवराज पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसवर कितपत प्रभाव पडणार याची आता चर्चा सुरू झाली आहे.

बसवराज पाटील हे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे कट्टर समर्थक. ‘देवघर’ हे लातूर शहरातील माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निवासस्थानाचे नाव आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला शिवराज पाटील यांचे आशीर्वाद आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एकेकाळी काँग्रेसच्या ‘किचन कॅबिनेट’मध्ये शिवराज पाटील यांचे नाव होते. त्यामुळे बसवराज पाटील यांचे भाजपमधील येणे अधिक महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

Srikala Reddy Singh and her husband Dhananjay Singh
नवरा तुरुंगात, बायको निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत श्रीकला रेड्डी?
Brand Thackeray
ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे… उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली… ठाण्यासाठी रॅप गाणे
devendra fadnavis
इंदापूरमधील नाराजीवर मनोमीलन सभेचा उतारा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मेळावा
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट

हेही वाचा – नगरमध्ये महायुतीत एकोप्याचा अभाव, महाविकास आघाडी संघटित

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोण, या चर्चेत आता बसवराज पाटील यांच्या नावाची भर पडली आहे. या लोकसभा मतदारसंघात उमरगा, औसा आणि बार्शी या विधानसभा मतदारसंघातील लिंगायत मतांचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळेच अलिकडे भाजपने लिंगायत मतांच्या बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. अजित गोपछेडे यांना राज्यसभेत बिनविरोध निवडून देण्यामागेही ही बेरीज असल्याचा दावा केला जात होता. मात्र, निवडणूक लढवून विजयी होणाऱ्या उमेदवाराचा भाजपचा शोध सुरूच होता. औसा विधानसभेत २००९ व २०१४ च्यामध्ये निवडून आलेल्या बसवराज पाटील यांना भाजपने हेरले. २०१९ मध्ये औसा मतदारसंघातून भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी बसवराज पाटील यांचा पराभव केला होता. त्यामुळे बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे अभिमन्यू पवार हे अधिक खूश झाल्याचे सांगण्यात येते. नांदेड, लातूर, धाराशिव या तीन लोकसभा मतदारसंघात लिंगायत मतांचा प्रभाव असल्याचे दिसून आले आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सूर्यकांत विश्वासराव यांना लक्षणीय मते मिळाली होती. त्यानंतर भाजपची रणनिती ठरवली जात होती.

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे पुन्हा कोल्हापुरात, हातकणंगले मतदारसंघासाठी लक्ष घातले

लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते भाजपच्या विचारसरणीला कधीच कडाडून विरोध करत नाहीत. शिवराज पाटील चाकूरकर हे तर रा. स्व. संघ परिवारातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात असत. सार्वजनिक कार्यक्रमामध्येही सौम्य शब्दात काँग्रेसची धर्मनिरपेक्ष भूमिका शिवराज पाटील मांडत. त्यांचे समर्थक बसवराज पाटील हेही सौम्यपणे आपल्या भावना व्यक्त करणारे. राजकीय पटलावरची लहानशी बाबही ते शिवराज पाटील यांना विचारुन करत. त्यामुळे शिवराज पाटील यांचे आशीर्वाद घेऊन बसवराज पाटील काँग्रेसमध्ये आले आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे. बसवराज पाटील यांच्या भाजपमध्ये येण्यामुळे धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला टिकवून धरणारा मोठा नेता शिल्लक राहिला नाही.