कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ३ जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय डाव खेळला होता. यात त्यांना त्यांचा धाकटा मुलगा विजयेंद्र याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. कर्नाटकमधील एका केंद्रीय मंत्र्याने उमेदवारीबाबत केंद्रीय नेतृत्वाची समजूत काढण्याची हमी दिली होती. जर भाजपाच्या राज्य कोअर कमिटीने शिफारस केली तर विजयेंद्र यांची निवड सोपी होईल असं त्या केंद्रीय मंत्र्याेन येडियुरप्पा यांना सागितले होते.

तथापि, भाजपाच्या राज्य कोअर कमिटीने विजयेंद्र यांच्या नावाची शिफारस केली होती. तरीदेखील १४मे रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपाचे प्रभारी अरूण सिंह आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. येडियुरप्पा यांच्या मुलाला सर्व प्रयत्न करूनही राज्यसभेची उमेदवारी नाकारणे म्हणजे त्यांचे पक्षाततील वर्चस्व कमी होत चालल्याचे संकेत आहेत. 

भाजपामधील सूत्रांच्या सांगण्यानुसार विजयेंद्र यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणे फारच कठीण होते. कारण गेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीपासून पक्षाने घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध करण्याचे ठरवले आहे. असे असूनसुध्दा एका केंद्रीय मंत्र्याने दिलेल्या अश्वासनावर विश्वास ठेवला गेला.तिकीट नाकरल्यानंतर येडियुरप्पा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की “मला विश्वास आहे की भाजपा योग्यवेळी माझ्या मुलाची दखल घेईल आणि त्याला योग्य बक्षीस देईल. मला विश्वास आहे की पक्ष लवकर त्यांच्यावर काही मोठी जबादारी टाकेल. जे निष्ठावान आहेत त्यांना पक्ष कधीही एकटे सोडणार नाही. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा घेतील. 

येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे चौकाश्यांचा ससेमिरा सुरू असताना त्यांना मात्र आपल्या धाकट्या मुलाचे राजकीय भवितव्य सुरक्षित करायचे आहे. काहीदिवसांपूर्वी येडियुरप्पा यांना २००६-२००७ या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यासाठी न्यायालयात हजर रहायचे होते. परंतु त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना अनुपस्थित राहण्याची सूट न्यायालयाने दिली होती.

विजयेंद्र यांना उमेदवारी नाकरल्यानंतर काही गटांनी सोशल मीडियावर येडियुरप्पा यांच्यावर टीका केली आहे. यामध्ये येडियुरप्पा यांनी लिंगायत समाजाच्या नावाचा राजकारणासाठी वातर केला पण बदल्यात समाजासाठी काही दिले नाही. असा सुरू करण्यात आला आहे.येडियुरप्पा हे कर्नाटक भाजपामधील एक मजबूत नेते आहेत. त्यांना राजकारणातून बाजूला ठेवले गेल्यास याचे राजकीय तीव्र राजकीय पडसाद उमटू शकतात याचाही येथील नेत्यांना जाणीव आहे. आणि म्हणूनच त्यांनी यावर सावध भूमिका घेतली आहे.