27 September 2020

News Flash

पुण्यातले ते १० जण मध्यप्रदेशात, विभागीय आयुक्तांची माहिती

त्या दहाजणांचा मरकजशी काही संबंध नाही असंही म्हैसेकर यांनी स्पष्ट केलं

करोना व्हायरस या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात आढळत आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहे. पण त्याच दरम्यान पुण्यातील शिरुर येथील १० जणांना होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र ते १० जण पळून जाण्याची घटना घडली असून ते सर्व दिल्ली येथील कार्यक्रमाला गेले होते.अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली. त्यावर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले की, शिरुर येथील १० जणांचा दिल्लीच्या कार्यक्रमाशी काही संबध नसून ते सर्व जण सध्या मध्यप्रदेशात आहेत. तेथील प्रशासना सोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले की, करोना व्हायरस आजाराच्या पार्श्‍वभूमीवर परदेशातून येणार्‍या नागरिकांची तपासणी केली जाते. त्यामध्ये करोना बाधित आढळल्यास त्यांच्यावर रूग्णालयात उपचार केले जातात किंवा बाधित नसल्यास दक्षता म्हणून होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला जातो. त्यानुसार दिल्ली येथून २३ फेब्रुवारीला पुण्यातील शिरुर येथे आलेल्या दहा जणांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र ते दहाजण ट्रक मधून पळून जाण्याची घटना घडली आहे. या पळून गेलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, ते मध्यप्रदेश येथे असल्याची माहिती मिळाली आहे. तेथील प्रशासना सोबत पोलिसांची चर्चा सुरू असून दिल्ली येथील मरकज येथील प्रकरणाशी त्या १० नागरिकांचा काही संबध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 10:10 pm

Web Title: 10 people from pune are now in mp says divisional commissioner deepak mhaisekar scj 81 svk 88
टॅग Coronavirus
Next Stories
1 पुणे विभागात करोनाग्रस्तांची संख्या १०४, विभागीय आयुक्तांची माहिती
2 पिंपरी-चिंचवड : आयुक्त, महापौर, सत्तारूढ पक्ष नेत्यांचे सोशल डिस्टसिंगला हरताळ
3 करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नायडू रुग्णालयात उभारला आधुनिक निर्जंतुकीकरण कक्ष
Just Now!
X