राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही शहरं यामध्ये आघाडीवर आहेत. आज पुणे शहरात दिवसभरात १०७ करोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे शहरात रुग्णांची संख्या ११६१ झाली आहे. तर चार रुग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ९५ झाली आहे. दरम्यान ५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर ३७८ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
महाराष्ट्रात ७९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर मागील चोवीस तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ५२१ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. आज महाराष्ट्रात १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रातील २ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2020 10:27 pm