News Flash

छेडछाड व पोलिसांच्या हलगर्जीपणा मुलीच्या जिवावर!

संबंधित मुलगी कोमात गेली असून, तब्बल बारा दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. पोलिसांकडून मात्र हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करण्यात येत होते.

| January 16, 2015 03:00 am

छेडछाड व पोलिसांच्या हलगर्जीपणा मुलीच्या जिवावर!

तरुणांकडून झालेली छेडछाड व त्यानंतर कारवाईच्या दृष्टीने पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे भोसरी येथे एका १५ वर्षे वयाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. संबंधित मुलगी कोमात गेली असून, तब्बल बारा दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर विविध सामाजिक व राजकीय मंडळींनी तिच्या पालकांना मदतीचे आश्वासन दिले आहे.
रस्त्यावर होणाऱ्या छेडछाडीने ही मुलगी हैराण झाली होती. ३१ डिसेंबरच्या रात्री छेडछाड झाल्यानंतर मुलीच्या पालकांनी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात खेटे घातले. त्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी केवळ अदलखपात्र गुन्हा नोंदवला. त्या नैराश्यातूनच मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न झाल्यानंतर हे प्रकरण अंलगट येऊ नये, यासाठी पोलिसांनी नंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला व या प्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2015 3:00 am

Web Title: 15 year girl faced molestation tries to commit suicide
Next Stories
1 सर्वसामान्यांसाठी करवाढ नको, थकबाकी प्रभावीरीत्या वसूल करा
2 आकुर्डीतील बजाज ऑटो कंपनीत आग
3 द्रुतगती की कासवगती?
Just Now!
X