News Flash

पुण्यातील लॉजमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

हा तरुण रविवारपासून लॉजमध्ये राहत होता.

संग्रहित छायाचित्र

वाल्हेकरवाडी रस्त्यावरील राजवाडा लॉजमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नयन सुबोध शेंडे ( वय १९, रा. पोलीस लाईन, वाकड) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. हा तरुण रविवारपासून या लॉजमध्ये राहत होता.  पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, नयन शेंडे याला वडील नसून तो मामाकडे राहत होता. त्याचे मामा पोलीस आहेत. नयनला घरचे सर्व जण आर्थिक मदत पुरवत होते. कोणतेही काम न करता घरातून  पैसे मिळत असल्यामुळे त्याला मौज मज्जा करण्याची सवय लागली होती.

त्याला मद्यपानाचही व्यसन होते. १३ ऑगस्टला रात्री दहाच्या दरम्याने वाल्हेकरवाडी येथील राजवाडा हॉटेलमध्ये तो राहण्यास आला. आज हॉटेलमधील कर्मचाऱ्याने आवाज दिल्यानंतर आतून प्रतिसाद आला नाही. त्यानंतर खिडकीतून पाहिल्यानंतर त्याने गळफास घेतल्याचे समोर आले. नयन कोणतेही काम करण्यास तयार नव्हता. त्याला सुधारवण्याचा मामाने खूप प्रयत्न केला, मात्र तो सुधारण्याची चिन्हे दिसत नव्हती. नैराश्यातूनच नयन शेंडेने आत्महत्या केली असावी, असा अंदाज देहू पोलिसांनी वर्तवला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 4:47 pm

Web Title: 19 years old youth commit suicide in pune
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमधील एका महिलेचा स्वतःची वेणी कापल्याचा दावा
2 बहुमजली मांडवांमुळे कोंडी
3 दोन नव्या ‘डेमू’ आल्या, पण यार्डातच!
Just Now!
X