पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १४४० रुग्ण आढळल्याने, ६२ हजार ३७ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात  २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर १ हजार ४२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाची लागण झाल्यानंतर उपचार घेणार्‍या १४५६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ४३ हजार ६०६ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी दिवसभरात १ हजार १२ करोना बाधित रुग्ण आढळले असून २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २६६ जण आज करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ११८ वर पोहचली असून १७ हजार ६७३ जण करोनामुक्त झालेले आहेत. त्याच बरोबर शहर आणि ग्रामीण भागातील एकूण ५४५ जणांचा आत्तापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या महानगर पालिकेच्या रुग्णालयात ४ हजार १७५ सक्रिय रुग्ण आहेत. अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.