पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने २७९ रुग्ण आढळल्याने १ लाख ६४ हजार ११५ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार ३६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्या ३६० रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ५५ हजार २२५ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १७२ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३५ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८९ हजार २८३ वर पोहचली असून पैकी ८६ हजार २७५ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६५८ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 8:45 pm