पुणे शहरात दिवसभरात ३२८ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ७५ हजार ७४३ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ५७२ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान २७९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ६६ हजार ६९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १६१ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ७७ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात एक जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९५ हजार २३१ वर पोहचली असून पैकी ९१ हजार ७८४ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ७५४ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.