पुणे शहरात दिवसभरात ३७२ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ६६ हजार २०९ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान १० रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ४१७ मृतांची संख्या झाली. २०९ रुग्णांचे  रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ५७ हजार १६४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १६४  करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४२ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९० हजार २८९ वर पोहचली असून पैकी, ८६ हजार ९९८ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६३१ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.