पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ४८६ रुग्ण आढळल्याने १ लाख ५५ हजार ६७ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार ८७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ९९८ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ३९ हजार ४५० रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २४६ करोना बाधित रुग्ण आढळले असून १८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ५२० जण आज करोनातून मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ८४ हजार २७५ वर पोहचली असून पैकी, ७९ हजार २७८ जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ५०९ येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.