उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिके त जाऊन विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दंड थोपटले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत पुणे महापालिके ची सत्ता खेचून आणणार असल्याचे त्यांनी जाहीर के ले. पुणे महापालिका क्षेत्रात समाविष्ट के लेल्या २३ गावांच्या समावेशाची प्रक्रियाही योग्य वेळी पूर्ण के ली जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिके च्या निवडणुका जवळ आल्या असल्याने महापालिके त जाऊन विकासकामांचा आढावा शुक्रवारी घेतला. महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्यात येणार असल्याचे जाहीर करून महापालिके वर पुन्हा सत्ता येणार असल्याचे भाकीत यांनी के ले. याबाबत बोलताना पवार म्हणाले, ‘सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत येणारच असे म्हणत असतो, तर विरोधी पक्ष सत्ता खेचून घेणार असे म्हणतो. तसे मी देखील पुणे महापालिके ची सत्ता खेचून आणणार. यापूर्वी पक्ष सोडून गेलेल्यांचा विचार करून एक-एक पाऊल उचलले जाणार आहे. मात्र, निवडून येण्याची क्षमता पाहूनच निर्णय घेण्यात येणार आहे.’

सीरममधील आग शॉर्ट सर्किटमुळे

सीरममधील आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अहवाल आला असल्याचे पवार यांनी शुक्रवारी जाहीर के ले. सीरममध्ये आग लागल्यावर मी तेथे गेलो होतो. त्या ठिकाणी असतानाच दुसऱ्यांदा आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अहवाला आला असून अन्य कोणतेही कारण नाही. तसेच करोनावरील लस देण्यासाठी होणारा खर्च केंद्राने द्यावा,केंद्राकडे वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) २७ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून हा निधी राज्य सरकारला उपलब्ध होत नसल्याने राज्याच्या अर्थसंकल्पावर परिणाम जाणवणार आहे, असेही त्यांनी सांगितले.