News Flash

पुण्यात नव्यानं निर्बंध लादणार?, अजित पवार म्हणाले…

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात करोना आढावा बैठक घेतली

ajit pawar ,Corona review meeting pune
उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला. दरम्यान आता तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात करोना आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्यानं निर्बंध लादणार का, यावर स्पष्टीकरण दिले.

अजित पवार म्हणाले, “मास्क वापरणं बंद केला तर खूप मोठ्या प्रमाणावर परिस्थिती बदलत आहे. पुण्यात जिथं जिथं कार्यक्रम, वाढदिवस झाले. तिथं संपूर्ण घरं करोना पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यात नव्यानं निर्बंध लादणार नाही, पण पुणेकरांनी निर्बंध लावण्याची वेळ सरकारवर आणू नये. मात्र करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असेल तर आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल.”

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध?

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लादणार का?, यावर बोलतांना अजित पवार म्हणाले, “नवीन निर्बंधाबाबत बैठकीच चर्चा झाली. परंतु मोठे मंडळ साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार असल्याने, नवीन निर्बंध लादणार नाही. पण नागरीकांनी गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याचं दिवशी कठोर भूमिका घेण्यात येईल. त्यामुळे तशा प्रकारची वेळ येवू नये.”

“शाळा सुरू घेण्याचा निर्णय जेव्हा होईल तेव्हापर्यंत सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ग्रामीण भागात रुग्ण संख्या अधिक आहे. पाच तालुक्यात रुग्ण अधिक आहेत. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रेट ४ टक्के आहे. टेस्टिंग अधिक होत असल्याने रुग्ण ही अधिक आहेत.”, असे देखील अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – “…नाहीतर पुन्हा येरे माझ्या मागल्या”; अजित पवारांचा खास ग्रामीण शैलीत विरोधकांना टोला

अजित पवारांची मोदी सरकारवर टीका

देशात प्रचंड महागाई वाढली आहे. गॅस डिझेल पेट्रोलचे भाव खूप वाढले आहेत. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले, अनेकांचे उद्योग अडचणीत आले आहेत. त्यासाठी लोकांनी आंदोलनं केली. पण केंद्र सरकार दखल घेताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दहा महिने होत आले पण चर्चा होताना दिसत नाही.  आता तर लोकसभेचं अधिवेशनही संपलं आता पुढच्या वर्षी अधिवेशनातच हा मुद्दा उपस्थित करता येईल. सध्या केंद्र सरकारची असलेली भूमिका ही देशाच्या जनतेचं दुर्दैव आहे, असे अजित पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2021 12:18 pm

Web Title: ajit pawar in pune corona pune corona review meeting pune lockdown srk 94
Next Stories
1 “…मला काही तेवढाच उद्योग नाही”; अन् अजित पवार संतापले
2 “…नाहीतर पुन्हा येरे माझ्या मागल्या”; अजित पवारांचा खास ग्रामीण शैलीत विरोधकांना टोला
3 ‘फोर्ब्स’कडून मराठी उद्योजकाचा सन्मान; जागतिक अब्जाधीशांच्या यादीत पुण्याच्या आनंद देशपांडेंचा समावेश