News Flash

पार्किंग धोरणाविरोधात पुणे महापालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा

प्रवेशद्वारं बंद करुन आंदोलकांना रोखले

पुणे महापालिकेच्या पार्किंग धोरणाविरोधात शुक्रवारी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.

पुणे शहरातील सर्व रस्त्यांवर दिवस-रात्र सशुल्क पार्किंग करण्याबाबत धोरण महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केल्याच्या निषेधार्थ आज महापालिकेवर भाजपा वगळता सर्व राजकीय पक्षांनी आंदोलन केले. यामध्ये चार चाकी वाहने आणि घोडागाड्यांसह आंदोलक सहभागी झाले होते. त्यामुळे महापालिकेसमोर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. महापालिकेत प्रवेशासाठीची सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने महापौर मुक्ता टिळक यांनाही काही काळ बाहेर थाबांवे लागले.

पुणे महानगरपालिकेत मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पार्किंग धोरणाला मंजुरी दिल्याने आज पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये पतित पावन संघटनेने बैलगाडी आणली होती, संभाजी ब्रिगेडने भीक मांगो आंदोलन केले तर आतील बाजूस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायऱ्यावर बसून निषेध व्यक्त केला. या सर्व राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेता. महापालिका प्रशासनाने मुख्य इमारतीची चारही प्रवेशद्वारे बंद केली होती. त्यामुळे आतून कोणाला बाहेर पडता येत नव्हते. तर बाहेरून कोणाला आत जाता येत नव्हते. त्यामुळे कामानिमित्त पालिकेत आलेल्या नागरिकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले.

त्यातच आज महापालिकेत सर्वसाधारण सभा असल्याने यामध्ये पार्किंग धोरणाचा विषय मंजुरीसाठी येणार असल्याने सर्वपक्षीय नगरसेवक प्रवेशद्वारावर अडकून पडले होत. त्यामुळे काही नगरसेवकांनी महापालिकेच्या भितीवरून जाणे पसंत केले. आत गेल्यावर आतील प्रवेशद्र देखील बंद असल्याने अनेक नगरसेवकांना बाहेरच थांबावे लागले. तेवढ्यात महापौर मुक्ता टिळक आल्या आणि प्रवेशद्वाराजवळ थांबल्या. मात्र, त्यांनाही काही काळ बाहेरच वाट पहावी लागील.

त्यानंतर सर्व साधारण सभा सुरु झाल्यावर शिवसेनेने पार्किंग धोरणाविरोधात काळे कपडे घालून आंदोलन करीत निषेध व्यक्त केला. हे सर्व आंदोलन पाहता भाजपाच्या विरोधात सर्व संघटना एकवटल्याचे पहायला मिळाले असून आता पार्किंग धोरण मंजूर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2018 4:40 pm

Web Title: all party front agitate against the pmcs parking policy the protesters stopped at entrance of pmc
Next Stories
1 नवजात बाळाचा मृतदेह हातात घेऊन वडील मागत होते न्याय !
2 विधवा, घटस्फोटित महिलांना पिंपरी पालिकेचा मदतीचा हात
3 पार्किंगचा बोऱ्या : वाहनतळांची तोकडी व्यवस्था
Just Now!
X