News Flash

पुणे शहरात उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार!

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारपरिषदेत दिली माहिती; जाणून घ्या आणखी काय सांगितलं आहे.

राज्यातील करोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्याचा दिसत असला तरी देखील, अद्यापही रूग्णांच्या मृत्यू संख्येत दररोज भर पडतच आहे. शिवाय, काही जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार कमी रुग्णसंख्या असलेली शहरे आणि जिल्ह्य़ांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली राहू शकणार आहेत. या पार्श्वभूमीव आज पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारपरिषद घेत, शहरातील नव्या निर्बंधांबाबत माहिती दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवारी ते शुक्रवारी सुरू राहतील. तर, शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू राहणार आहेत. याशिवाय, शहरातील उद्यानं, व्यामशाळा(जिम), हॉटेल बंद राहणार असून, पार्सल सुरू राहणार आहे.

पुढील दहा दिवसांसाठी हा आदेश असणार आहे. आता २ वाजेपर्यंत नागरिकांच्या दृष्टीने सर्व सेवा सुरू राहणार आहेत. पण त्यानंतर नागरिकांनी बाहेर पडू नये. पीएमपीएमएल बस सेवा अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍यांसाठी सुरू राहणार आहे, इतर नागरिकांना त्याद्वारे प्रवास करता येणार नाही, अशी देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली.

या संदर्भात पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी परिपत्रकाद्वारे १५ जून रोजी सकाळी ७ वाजपर्यंत सुधारित आदेश निर्गमित केले आहे.
१.अत्यावश्यक सेवामधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहातील.
२. पुणे मनपा क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू राहातील.
३. पुणे मनपा क्षेत्रातील अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट व बार हे केवळ पार्सल व घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.
३. ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मूभा राहील.
४. दुपारी ३ वाजेनंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण, अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णत: प्रतिबंध राहील.
७. सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहातील.
८. मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहातील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 6:14 pm

Web Title: all shops in pune will be open from 7 am to 2 pm from tomorrow msr 87 svk 88
Next Stories
1 … अखेर भाजपा आमदार महेश लांडगे यांच्यासह ६० जणांविरूद्ध गुन्हा दाखल!
2 करोना नियमांकडे दुर्लक्ष करत आमदार महेश लांडगे यांचा कार्यकर्त्यांसह डान्स!
3 Corona Vaccine: पुणेकरानं लिहिलं फायझरला पत्र, चक्क सीईओनं दिलं उत्तर
Just Now!
X