समाजमाध्यमातून शिस्तीचे धडे

मराठा क्रांती मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर संयोजकांनी मोठय़ा प्रमाणावर समाजमाध्यमांचा वापर करून मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांना शिस्तपालनाच्या सूचना दिल्यामुळे मोर्चाचे नियोजन व्यवस्थित व शिस्तबद्ध झाले. वाहने लावण्याच्या जागा, मोर्चाच्या मार्गाचा नकाशा, मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांना व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सूचना याचा चांगला परिणाम झाला आणि संयोजकांनी दिलेल्या सूचना सर्वानी अमलात आणून पोलिसांनाही सहकार्य केले.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?

मराठा क्रांती मोर्चात पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच भोर, वेल्हा, पुरंदर, मुळशी, मावळ, आंबेगाव, राजगुरुनगर, शिरूर, नगर रस्ता भागातून मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. संयोजकांनी आठवडय़ापूर्वी व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व व्यवस्थेची माहिती मोर्चात सहभागी होणाऱ्यांना दिली होती. त्यासंबंधीचे संदेश गेला आठवडाभर मोठय़ा प्रमाणावर प्रसारित झाले होते. या संदेशातून शिस्तीचे धडे देण्यात आले होते.

रविवारी सकाळी सातनंतर शहराच्या मध्य भागातून गटागटाने नागरिक डेक्कन परिसराक डे निघाले होते. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जवळपास पाच हजार स्वयंसेवकांची नेमणूक क रण्यात आली होती.

जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागातून मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी चाळीस ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याची माहितीदेखील व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून देण्यात आली होती. जिल्ह्य़ातील नागरिकांसाठी मार्गाचा नकाशा पाठविण्यात आला होता. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मोर्चात मोठय़ा संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनाही सूचना देण्यात आल्या होत्या.

समाजमाध्यमांतून दिलेल्या सूचना

  • शिस्तीचे दर्शन घडवा
  • घोषणाबाजी नको
  • गटागटाने येणाऱ्यांनी डेक्कन भागात जमावे
  • राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता
  • पोलिसांना सहकार्य करा
  • रस्त्यावर बाटल्या, खाद्यपदार्थ टाकू नका
  • कचरा उचलून टाका
  • महिलांना सहकार्य करा