विभागीय आयुक्तांची कबुली; टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न

पुणे : प्राणवायू उत्पादक कंपन्या वैद्यकीय सुविधेऐवजी औद्योगिक वापरासाठी जास्त प्राणवायू उत्पादन करत आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्य़ात प्राणवायूची कृत्रिम टंचाई उत्पादकांनी निर्माण के ली आहे, अशी कबुली विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी दिली. ही टंचाई दूर करण्यासाठी प्राणवायू उत्पादक कंपन्यांना ८० टक्के  प्राणवायू वैद्यकीय उपचारांसाठी देण्याचे आदेश दिले असून गरज पडल्यास त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येईल. तसेच या कं पन्यांवर देखरेख ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, महसूल, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही राव यांनी सांगितले.

शहरासह जिल्ह्य़ात करोना रुग्णांसाठी प्राणवायू कमी पडत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राव म्हणाले, ‘उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे आणि अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस. डी. पाटील यांची प्राणवायू वितरणासाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्य़ातील लहान-मोठय़ा रुग्णालयांना प्राणवायूचा अखंड पुरवठा होतो किं वा कसे?’ हे पाहण्याची जबाबदारी सुरवसे यांची, तर प्राणवायूचा काळाबाजार रोखण्याची जबाबदारी पाटील यांच्याकडे आहे. पुण्याशेजारील रायगड जिल्ह्य़ात जेएसडब्ल्यू या कं पनीकडे प्राणवायूचा तीन हजार मेट्रिक टन एवढा मोठा साठा उपलब्ध आहे. टँकरद्वारे हा साठा पुण्यात आणण्यात येणार आहे.’

चाकण येथील एअर लिक्विड या कंपनीकडून वैद्यकीय सुविधांसाठी ५ ऑक्टोबरपासून प्राणवायू पुरवण्यात येणार आहे. मात्र, तोपर्यंत कमतरता भासू नये म्हणून याच कं पनीचा गुजरातमधील भरूच जिल्ह्य़ातील प्रकल्पातून प्राणवायूची आयात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असेही राव यांनी सांगितले.

..म्हणून पुण्यात प्राणवायूची टंचाई

पुणे जिल्ह्य़ात एकू ण ११ कं पन्यांकडून प्राणवायूचे उत्पादन के ले जाते. या कं पन्यांकडून ८५०० मे. टन प्राणवायूचे उत्पादन के ले जाते, त्यापैकी ३५० मे. टन वैद्यकीय कारणांसाठी प्राणवायू दिला जातो. गेल्या काही दिवसांत या कं पन्यांकडून औद्योगिक कारणांसाठी प्राणवायू देण्याकडे वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुण्यात शासकीय आणि खासगी लहान रुग्णालयांना प्राणवायूची टंचाई भासत आहे, असेही राव यांनी स्पष्ट के ले.